आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayam Controversial Statement Coined United Nation

बलात्कारासंबंधी वादग्रस्त वक्तव्यावरून UNO च्या कार्यक्रमात मुलायम सिंहांवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या बलात्कारासंबंधीच्या वक्तव्यावर संयुक्त राष्ट्रंच्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. मुलांकडन चुका होतच असतात, असे वक्तव्य मुलायम सिंह यादव यांनी केले होते. अशा प्रकारची वक्तव्येच भारतात महिलांवर होणा-या अत्याचारांना कारणीभूत ठरत असल्यचे मतही या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले. जिनिव्हामध्ये सध्या संयुक्त राष्ट्रांचा कनव्हेंशन ऑफ द एलिमिनेशन ऑफ ऑल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन (सीडा) हा कार्यक्रम सुरू आहे.
भारताचे प्रतिनिधी म्हणाले, मिडियाने हाईप दिली
कार्यक्रमात भाग घेतलेल्या लखनऊच्या एका संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय महिलांवर वाढलेल्या अत्याचारांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. पॅनलने भारतीय नेत्यांच्या असंवेदनशील वक्तव्यांचाही समाचार घेतला. मात्र पॅनलच्या टीकेला उत्तर देताना भारताच्या प्रवक्त्यांनी याचे खापर माध्यमांवर फोडले. माध्यमांनी या वक्तव्यांना हाईप दिली असे उत्तर प्रवक्त्यांनी दिले.

बदायूं गँगरेपवरही चर्चा
इंटरनॅशनल पॅनलने भारतात महिला, दलित आणि मागासांवर होणारे अत्याचार आणि यासंबंधी गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण यासंदर्भात चिंता व्यक्त केली. भारत सरकारने हे सर्व थांबवण्यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे असल्याचेही म्हटले आहे. पॅनलने भारतीय शिष्टमंडळाकडे बदायूं प्रकरणाच्या चौकशीविषयीही विचारणा केली. त्यावर देशाची प्रमुख तपास संस्था याचा तपास करत असल्याचे उत्तर भारतीय प्रवक्त्यांनी दिले. घटनेत पोलिसांच्या सहभागाबाबतही पॅनलने विचारणा केली. त्यावर अशा अधिकारी किंवा कर्मचा-यांना निलंबित करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र त्यावर पॅनलने नाराजी व्यक्त केली. निलंबन आणि शिक्षा यात फरक असतो, अशा शब्दांत त्यांनी शिष्टमंडलाला सुनावले.
मुलायम यांचे वादग्रस्त वक्तव्य
लोकसभा निवडणुकाच्या प्रचारादरम्यान 10 एप्रिलला मुरादाबादच्या एका रॅलीमध्ये मुलायम सिंह यादव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. सर्वच प्रकरणांत बलात्काराच्या गुन्ह्यांत फाशीची शिक्षा देणे चुकीचे आहे. मुलांकडून चुका या होतच असतात. मुंबईत तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे व्हायला नको होते. त्यामुळे अशा प्रकारचे असे कायदे बदलणे गरजेचे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
फोटो : जिनिव्हा मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कनव्हेंशन ऑफ द एलिमिनेशन ऑफ ऑल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन (सीडा) मध्ये सहभगी झालेले विविध देशांचे सदस्य.

पुढे वाचा काय आहे... CEDAW...