आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायमसिंह यांचा काँग्रेसला झटका, आयपीएल प्रकरणी आज चर्चा होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे २५ खासदार लोकसभेत परतताच सोमवारी सभागृहात पुन्हा गदारोळ झाला व कामकाज स्थगित झाले. राज्यसभेतही सोमवारी काहीच काम होऊ शकले नाही. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे अवघे तीन दिवस उरले आहेत. संपूर्ण सत्रावरच कामकाज न झाल्याचा ठपका बसू नये याचे प्रयत्न सुरू आहेत. गदारोळ सुरू असतानाच लोकसभेत समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी काँग्रेसच्या गोंधळावर आक्षेप घेत सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली.

लोकसभेत व नंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुलायमसिंह यादव यांनी काँग्रेसला स्पष्ट शब्दांत सुनावले की, बोलायचे असेल तर सभागृहात बोला. बोलायचे नसेल तर सभागृहावर बहिष्कार टाकून जनतेमध्ये जा. परंतु संसदेत गोंधळ घालू नका. लोकशाहीत मनमानी चालणार नाही. त्यांनी हेही स्पष्ट केले की जे आरोप केले जात आहेत व ज्यांच्यावर आरोप होत आहेत, त्यांनाही सभागृहात बोलण्याचा, त्यांचे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. या चर्चेनंतर असे संकेत मिळाले की, लोकसभेत मंगळावारी नियम १९३ अंतर्गत आयपीएलशी संबंधित मुद्यांवर चर्चा होऊ शकते.तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनीही सभागृहात कामकाज होऊ देण्याच्या बाजूने मत व्यक्त केले.

परंतु त्यांचे असे म्हणणे होते की, काँग्रेसच्या स्थगन प्रस्तावावरही सभागृहात चर्चा झाली पाहिजे. सरकारच्यावतीने नियम - १९३ नुसार चर्चा करण्याचा प्रस्ताव मान्य होणार नाही. त्याआधी संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझादयांच्याशी चर्चा केली. त्यांना कामकाजातील अडथळा संपण्याचे आवाहन केले.
मोदींनी किती पैसे दिले ? सुषमांना प्रश्न
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारीही भूमिकेवर ठाम दिसले. सुषमा स्वराज यांचे संसदेतील भाषण चांगले होेते. परंतु कृपया देशाला हे सांगा की ललित मोदींकडून किती पैसा तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांच्या खात्यावर आला? तुम्ही याचा खुलासा करा, सभागृहाचे कामकाज सुरळीत होईल, असे राहुल म्हणाले.

ललित मोदींबाबत कुणी औदार्य दाखवू शकते हे त्यांनी सांगितले. परंतु ही मदत लपून छपून का केली. मंत्रालयाला कल्पना देऊन का झाली नाही. तुम्ही जे काही केले ते देशाला सांगू का केले नाही. कृपया देशाला हे सांगा की ललित मोदींकडून किती पैसा तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांच्या खात्यावर आला? तुम्ही याचा खुलासा करा, सभागृहाचे कामकाज सुरळीत होईल, असे राहुल म्हणाले.
गोंधळाला सोनिया - राहुलच जबाबदार : जेटलींचा आरोप
भाजपनेही काँग्रेसवर पलटवार करण्याची संधी सोडली नाही. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचे दोन नेत्यांच्या (सोनिया गांधी व राहुल गांधी) जिद्दीमुळेच सभागृ़हात कामकाज होऊ शकले नाही. वस्तू व सेवा कराशी (जीएसटी) संबंधित दुरुस्ती विधेयक अडवण्यासाठीच पराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला.
केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काँग्रेस सरकारवर आरोप करत आहे. पण त्याला प्रत्युत्तर देण्याची संधीच आम्हाला देत नाही. या हिट अँड रन धोरणामुळे राजकीय लाभ होईल, असे त्यांना वाटत असेल तर ते चूूक करत आहेत.