आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayam Grand Son Tej Pratap Yadav Will Marry Lalu Daughter

दिल्लीत शाही थाटात झाला लालूंची कन्या आणि मुलायम यांच्या नातवाचा साखरपुडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची मैत्री आता नात्यात रुपांतरीत झाली आहे. लालूंची मुलगी राजलक्ष्मी हिचा विवाह मुलायमसिंग यांचा चुलत नातू तेज प्रताप यांच्याबरोबर ठरला आहे. या दोन राजकीय घराण्याचे नात्‍यात रूपांतर झाले ते काल झालेल्‍या साखरपुडा सोहळ्यात. साखरपुड्याचा कार्यक्रम मंगळवारी दिल्लीच्‍या शकुंतला फार्म हाउसमध्‍ये झाला.
या निमित्ताने फार्म हाऊसची सजावट करण्यात आली होती. त्यासाठी विविध फुलांचा वापरही करण्यात आला. दोन राजकीय घराण्‍यांचा हा कार्यक्रम असल्‍यामुळे आनेक राजकीय मान्‍यवरांची उपस्थिती होती. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्‍यात आली होती. या साखरपुड्याच्‍या निमित्ताने मुलायम सिंग यादव, त्यांचा भाऊ रामगोपाल यादव, शिवपाल यादव, मुख्‍यमंत्री आखीलेश यादव, धमेंद्र यादव आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी लालू प्रसाद यादव यांनीही आपले नातेवाईक आणि स्‍नेहींना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.
मुख्‍यमंत्री अखिलेशने केले सर्वांचे स्‍वागत
या कार्यक्रमात मुख्‍यमंत्री अखिलेश कुमार हे सर्व पाहुण्यांचे स्‍वागत करण्‍यात व्‍यस्‍त होते. यादव परिवाराला शुभेच्‍छा देण्‍यासाठी आलेले बिहारचे मुख्‍यमंत्री रामगोपाल यावद यांचे स्‍वागत अखिलेश कुमार यांनी केले. या कार्यक्रमासाठी नीतीश कुमार, जदयूचे प्रमुख शरद यादव आणि रामगोपाल यादव यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
पुढील स्‍लाईडवर पाहा शकुंतला फार्म हाऊसमधील कार्यक्रमाची छायाचित्रे...