आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- कॉंग्रेसचे केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्यात आज संसदेमध्ये प्रचंड खडाजंगी उडाली. मुलायम सिंह हे लुटारू आणि दहशतवाद्यांचे साथीदार आहेत, असे वक्तव्य या केंद्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केले. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात यावरुन तीव्र पडसाद उमटले. मुलायम सिंह यादव यांनी बेनीप्रसाद यांची 'औकात' काढताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर बेनीप्रसाद यांनी पुन्हा उत्तर दिले. यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. अखेर कामकाज तहकूब करावे लागले.
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आयोजित एका सभेत बेनीप्रसाद वर्मा यांनी मुलायमसिंह हे दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर मुलायम सिंह यादव हे मायावतींपेक्षा भ्रष्ट असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या आरोपांमुळे भडकलेल्या मुलायम सिंह यांनी आज लोकसभेत बेनीप्रसाद वर्मांवर जोरदार टीका केली. बेनीप्रसाद वर्मा यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात यावे आणि त्यांनी माफी मागावी, अशी मागणी मुलायम सिंह यादव यांनी केली. त्यावर, राजीनामा मागणारे मुलायम सिंह कोण होतात, असे बेनीप्रसादांनीही मुलायम सिंह यांना तेवढ्याच जोशात उत्तर दिले. यानंतर लोकसभेत वातावरण चांगलेच गरम झाले. समाजवादी पार्टीच्या खासदारांनी दोन्ही सभागृहांमध्ये कॉंग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.
कॉंग्रेसनेही याप्रकरणी वर्मा यांना तंबी दिली आहे. संसदेमध्ये बोलताना भान राखावे. वर्मा यांचे वक्तव्य स्विकारर्ह नाही, असे केंद्रीय मंत्री कमल नाथ यांनी स्पष्ट केले. वर्मा यांनी कोणावरही टीका करताना योग्य भाषा वापरावी, असे कॉंग्रेसचे प्रवक्त जनार्दन त्रिवेदी यांनी म्टले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.