नवी दिल्ली - अहमदाबात मुंबई दरम्यानच्या प्रस्तावित बुलेट ट्रेन कॉरिडोर ही जगातील सर्वात स्वस्त हायस्पीड रेल्वेसेवा ठरू शकते. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार या कॉरिडोरसाठी सर्वेक्षण करणाऱ्या जपानच्या टीमने 'फेअर बॉक्स मॉडेल' तयार केले आहे. त्यानुसार बुलेट ट्रेनचे भाडे याच रूटवरील इतर रेल्वेच्या फर्स्ट एसीच्या भाड्याच्या दीडपट असेल. हा रिपोर्ट जुलै महिन्यात रेल्वे मंत्रालयासमोर सादर केला जाण्याची शक्यता आहे.
या रेव्हेन्यू मॉडेलनुसार, मुंबईपासून अहमदाबाद दरम्यान सध्या बुलेट ट्रेनचे भाडे 2800 रुपयांच्या जवळपास होते. 2023 मध्ये एसी फर्स्टचे भाडे बुलेट ट्रेनचे भाडे काय असणार हे ठरवेल. सध्या या रूटवर फर्स्ट एसीचे भाडे सुमारे 1895 आहे. या टीमचा अंदाज असा आहे की, 2023 पासून ही सेवा सुरू होईल आणि दररोज सुमारे 40 हजार लोक या कॉरीडोरचा वापर करतील. या कॉरीडोरवर 10 स्टेशन असू शकतात. त्यावर 98 हजार कोटी रुपये खर्च केले जाण्याची शक्यता आहे. सध्या साधारण रेल्वे या रूटवर आठ तासांत 534 किमीचा प्रवास करतात. बुले ट्रेन हे अंतर दोन तासांत कापेल.
सर्वेक्षणातील मुद्दे...
जपानच्या टीमने प्रस्तावित कॉरीडोरसाठी लोकांमध्ये जाऊन सर्वेक्षणही केले. ताशी 320 किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी ते किती भाडे देऊ शकतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुत्रांच्या मते, जपानच्या टीमने भाडे ठरवण्यासाठी त्यांच्या रेव्हेन्यू मॉडेलच्या किचकट पद्धतीशिवाय लोकांच्या मतांनाही महत्त्व दिले. त्यानुसार भाडे जास्त असले तर लोक विमानाचा पर्याय निवडतील असे त्यात समोर आले. तसेच भाडे कमी असले तर रेव्हेन्यू मॉडेलला सपोर्ट करू शकणार नाही.
सध्या कुठे किती भाडे
- जपानमध्ये टोकियो-शिन-आमोरी येथे चालणाऱ्या हयाबुसा रेल्वेच 713 किमीच्या प्रवासासाठी 8 हजार रुपये मोजावे लागतात.
- चीनच्या जिंघू हाय स्पीड रेल्वेत बीजिंग ते शाघाय दरम्यान सेकंड क्लासचे तिकिट 5000 रुपये असते.