लाहोर / नवी दिल्ली - २००८च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहेमान लख्वीला ताब्यात घेण्याचा आदेश निलंबित करण्याच्या लाहोर उच्च न्यायालयाच्या निकालावर भारताने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पाकिस्तान या विषयी गंभीर नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी न्यायालयात योग्य पुरावे सादर न केल्यामुळेच ही स्थिती बनली आहे. लख्वीसारखा अतिरेकी तुरुंगाबाहेर येऊ नये, असा पुनरुच्चार सरकारने केला.