आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदचा साथीदार जावेद चिकन्याने केली दोन भाजप नेत्यांची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातमध्ये भरुच येथे दोन नोव्हेंबर रोजी भाजपच्या दोन स्थानिक नेत्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी चार आरोपींना स्थानिक न्यायालयाने आठ दिवसांच्या रिमांडवर गुन्हे शाखेकडे सोपवले आहे. या घटनेमागे दहशतवादी कट तसेच कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सहकारी जावेद चिकना याचा हात असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. एटीएसने याप्रकरणी आतापर्यंत मुख्य हल्लेखोरासह सात जणांना अटक केली आहे. एटीएसने या प्रकरणाचा खुलासा करताना म्हटले की, भरुच येथील भाजपचे माजी अध्यक्ष शिरीष बंगाली व भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश मिस्त्री यांची हत्या जावेद चिकनाने कट रचून केली. जावेद चिकना १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील फरार आरोपी आहे. तो सध्या दक्षिण आफ्रिकेत असून त्याने अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या विरोधात हिंदू नेत्यांची हत्या करण्यासाठी सुरत येथील गुंडांना ५० लाखांची सुपारी दिली होती.
बातम्या आणखी आहेत...