नवी दिल्ली - 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा दोषी याकूब मेमनने क्यूरेटीव्ह पिटीशन रद्द झाल्यानंतर आज (गुरुवार) पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे. यावेळी त्याने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, की त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. कारण टाडा कोर्टाने जारी केलेले डेथ वॉरंट बेकायदेशीर आहे. दोन दिवसांपूर्वीच मेमनची क्यूरेटीव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने रद्द केली होती.
काय आहे याकूबचा सवाल
याकूब मेमनच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या अर्जात टाडा कोर्टाच्या डेथ वॉरंटला बेकायदेशीर म्हटले आहे. त्यांनी तांत्रिक मुद्यांच्या आधारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अर्जात म्हटले आहे, की टाडा कोर्टाने डेथ वॉरंट जारी करतानी कायदेशीर प्रक्रियांचे पालन केलेले नाही. जेव्हा डेथ वॉरंट जारी करण्यात आले तेव्हा मेमनसाठी न्यायासाठीचे सर्व दरवाजे उघडे होते. सुप्रीम कोर्टात क्यूरेटीव्ह पिटीशनवर सुनावणी होण्याआधी डेथ वॉरंट कसे काय जारी होऊ शकते. फक्त पुनर्विचार याचिका रद्द झाली म्हणून डेथ वॉरंट कसे काय काढता येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
गुरुवारी दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे, की क्यूरेटीव्ह पिटीशनच्या सुनावणी आधी डेथ वॉरंट जारी करणे बेकायदेशीर आहे. नियम आणि कायद्याचे पालन झालेले नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, याकुबला भेटण्यासाठी पोहोचले कुटुंबीय.... बघा फोटो...