आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या काँग्रेस नेत्यांचा राहुल गांधींनी घेतला वर्ग, पक्षातील वाद मिटवण्याची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सातत्याने एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या मुंबर्इतील पक्षनेत्यांचा काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीत ‘वर्ग’ घेतला. ‘तुमच्या गटबाजीचा फटका पक्षाला बसू देऊ नका, तर मुंबर्इ महापालिकेच्या निवडणुकीत सर्व नेत्यांनी एकत्रितपणे सर्वाेत्तम कामगिरी करून दाखवा,’ असा सल्लाही त्यांनी नेत्यांना दिला.
काँग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या दिल्लीतील ‘१२, तुघलक’ या निवासस्थानी बुधवारी मुंबईतील नेत्यांची बैठक बाेलावण्यात अाली हाेती. या वेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री गुरुदास कामत, माजी खासदार प्रिया दत्त, मिलिंद देवरा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग, अॅड. जनार्दन चांदूरकर, आमदार असलम शेख, माजी मंत्री आरिफ नसीम खान, बाबा सिद्दिकी अादी उपस्थित होते. या सर्वांना ‘यापुढे न भांडता मुंबर्इ काँग्रेस एकसंघ कशी राहील याचा प्रयत्न करा. मुंबर्इ महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने उत्तम कामगिरी करायला पाहिजे,’ अशी ताकीदच राहुल गांधी यांनी दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत व संजय निरुपम यांच्यातील अंतर्गत वाद टाेकाला गेले हाेते. निरुपम यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे दिल्यापासून कामत गट व पक्षातील जुन्या निष्ठावंतांमध्ये नाराजीची भावना व्यक्त केली जात हाेती. याच नाराजीतून कामत यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेण्याचीही घाेषणा केली हाेती. दरम्यान, साेनिया गांधी अाणि राहुल गांधी यांनी कामत यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. अाता पक्षश्रेष्ठींकडून कामतांना बळ देण्यात अाले. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी निरुपम व अन्य नेत्यांशी चर्चा करीत साैहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचा सल्ला दिला.
पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्याची ग्वाही
संजय निरुपम यांच्या कार्यशैलीला कंटाळून मुंबईतील अनेकांनी पक्ष साेडण्याचा निर्णय घेण्याची तयारी केली हाेती. याची कुणकुण लागताच राहुल यांनी या प्रकरणात लक्ष घातले. या बैठकीत गुरुदास कामत व निरुपम गटाच्या नेत्यांनी वादाची कारणे काेणती अाहेत याकडे राहुल यांचे लक्ष वेधले. त्यावर ‘अाता सगळ्या नेत्यांना साेबत घेऊन मुंबर्इ महापालिकेच्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून दाखवू,’ असा विश्वास निरुपम यांनी राहुल गांधी यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...