आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला सुरू होणार नविन दिल्‍ली-मुंबई राजधानी एक्‍सप्रेस, चार तासांचा प्रवास वाचणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नवी दिल्ली आणि मुंबई दरम्यान नवीन राजधानी एक्‍सप्रेस सुरू केली जाऊ शकते. रेल्‍वे अधिका-याकडून मिाळालेल्‍या माहिती नुसार दिवाळीच्‍या मुहुर्तावर ही नविन राजधानी रेल्‍वे सुरू केली जाईल. या मार्गावरील ही तिसरी राजधानी रेल्‍वे असेल. या गाडीच्या शुभारंभानंतर, वांद्रे (मुंबई) ते निजामुद्दीन (दिल्ली) चा प्रवास 13 तासांत पूर्ण केला जाईल. आता या प्रवासास 15 ते 17 तास लागतात म्‍हणजे आता या प्रवासासाठीचे प्रवाशांचे चार तास वाचू शकतील. रेल्‍वेचा हा प्रयोग दोन दिवस प्रायोगीक तत्‍वावर राहणार असुन त्‍यानंतर दिवाळीला या नविन राजधानी रेल्‍वेचा शुभारंभ होणार आहे. 
 
- एका रेल्वे अधिका-याने वृत्तसंस्‍थेसोबत बोलताना या नवीन राजधानी गाडीची माहिती दिली. अधिकारी म्हणाले की, नवीन राजधानी दिवाळीला याच वर्षी सुरू करणार आहे. नविन गाडीच्‍या  प्रारंभानंतर, दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास 13 तासांत पूर्ण केला जाऊ शकतो.
- सध्या या मार्गावर दोन राजधानी एक्स्प्रेस आहेत. पहिली म्हणजे - ऑगस्ट क्रांती राजधानी आणि दुसरे मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस.
- या दोन्ही गाड्या नवी दिल्ली आणि मुंबई अंतरा करिता 15 तासांपेक्षा जास्त वेळ घेतात.
 
किती अंतर आणि किती वेळ?
- ऑगस्टचा क्रांती 17 तास 5 मिनिटांत दिल्ली ते मुबंई प्रवास (1,377 किलोमीटर) पूर्ण करते. तिचा सरासरी वेग 80 किमी प्रति तास आहे.
- मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली (याला सामान्यतः मुंबई राजधानी एक्स्प्रेस असे म्हणतात.) राजधानी 15 तास आणि 35 मिनिटांत 1386 किमी अंतरावर आहे. त्याची सरासरी वेग 89 किमी प्रति तास आहे.
- अधिका-यांच्‍या मते, चाचणी एक किंवा दोन दिवसात सुरू होईल. आम्ही सध्या दोन इंजिन्स आणि 24 डब रॅक्स वापरून प्रवास पूर्ण करण्यासाठी काही तास कमी केले जाऊ शकते का हे तपासण्याचा प्रयत्न करीत आहोत.
बातम्या आणखी आहेत...