आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात 10 सर्वात जास्त शोधलेल्या शहरांत मुंबईही; न्यूझीलंड हा भारतीयांचा सर्वाधिक पसंतीचा देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई - नव्या वर्षात मुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या देशी आणि परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. बुकिंग डॉट कॉम या पर्यटन संकेतस्थळानुसार २०१७ मध्ये पर्यटनासाठी मुंबई जगातील सर्वात जास्त पसंतीच्या १० शहरांत समाविष्ट आहे. मुंबईशिवाय आइसलँडचे रेझाविक, ऑस्ट्रेलियाचे केर्न्स, अमेरिकेचे सवाना, प्युर्टोरिको, जपानचे क्योटो आणि ब्राझीलचे जेरीकोकोराही टॉप-१० मध्ये सहभागी आहे.

त्याशिवाय सामान्यपणे सुटीत दुबई, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरला फिरायला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना आता इतर स्थळे आवडत आहेत. स्कायस्कॅननुसार, २०१७ मध्ये भारतीय पर्यटकांनी मध्य-पूर्व, युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात जास्त रस दाखवला आहे. न्यूझीलंड भारतीयांचा सर्वाधिक पसंतीचा देश ठरला. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मलेशिया, सिंगापूर, तुर्की, फिलिपाइन्सही भारतीयांना पसंत
ब्रिटनपेक्षा न्यूझीलंडचा सर्च तिप्पट नव्या वर्षी ब्रिटनच्या तुलनेत न्यूझीलंडसाठी भारतीय पर्यटकांची संख्या वर्षात तिप्पट झाली आहे. मलेशिया, सिंगापूर, थायलंडला मागे टाकून सर्चबाबत ऑस्ट्रिेलियाला दुसरी पसंती मिळाली आहे.

भारतीयांना आंतरराष्ट्रीय सहलीत जास्त रस : २०१६ च्या पहिल्या सहामाहीत सुटी घालवण्यासाठी स्थळे शोधणाऱ्या भारतीयांची संख्या एक वर्षात ८०% वाढली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्थळांचा जास्त शोध घेतला. देशातील पर्यटनस्थळांचा शोध १२% वाढला.

२०१७ साठी योजना
नवीन वर्षात सुटीत भटकंती करणाऱ्या पर्यटकांनी तंत्रज्ञान, बिझनेस टूर, नवीन ठिकाणांचा शोध, मानसिक-शारीरिक शांती, इको-फ्रेंडली टूरसारख्या क्षेत्रात पसंती व्यक्त केली.

- मानसिक-शारीरिक शांती महत्त्वाची
४८ टक्के पर्यटकांच्या मते, त्यांना काम व जीवनात संतुलन हवे आहे. आरोग्य व मानसिक शांती सर्वात जास्त गरजेची आहे. त्यात भारत, चीन व थायलंडच्या पर्यटकांचा समावेश आहे.

- शॉपिंग नाही, भटकंतीत रुची
सुमारे ६० टक्के पर्यटकांनी शॉपिंगऐवजी भटकंती करण्यात अधिक रुची असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, छोट्या-छोट्या क्षणांना जगण्यात मजा असते.

- तंत्रज्ञानही गरजेचे
५२ टक्के पर्यटकांच्या मते, सुटी घालवण्यासाठी ट्रॅव्हल अॅपचा वापर वाढवण्यात येणार आहे. ४४ टक्के पर्यटक सहजपणे तंत्रज्ञानाचा वापर करतील.

- मित्र गेले नाहीत, अशा ठिकाणी जाणार
यंदा पर्यटकांमध्ये नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. ४७ टक्के म्हणाले, मित्र ज्या ठिकाणी पोहोचले नाहीत त्या ठिकाणी जायला आवडेल. ४५ टक्के पर्यटकांनी अॅडव्हेंचर्स टूरवर जायला आवडेल, असे सांगितले.

- नवनवीन लोकांना भेटायला आवडेल
४२ टक्के पर्यटक म्हणाले, सुटीच्या दरम्यान आम्ही नवनवीन लोकांंना भेटणार आहोत. मदत किंवा मैत्रीपूर्ण व्यवहार नसलेल्या ठिकाणी आपण थांबणार नाही.

केवळ बिझनेससाठी पर्यटन नाही
बिझनेस व लेझर अर्थात ब्लेझर पर्यटकांत ट्रेंड वाढत आहे. ४९ टक्के म्हणाले, कामापेक्षा स्वतंत्रपणे फिरण्यावर भर देणार आहोत.
बातम्या आणखी आहेत...