आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांचे टार्गेट मुंबई; नक्षलवाद्यांची जयराम रमेश यांच्‍या हत्‍येची धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बुद्धगया येथे महाबोधी मंदिरात रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी 'इंडियन मुजाहिदीन'ने स्‍वीकारली आहे. या दशहवातदी संघटनेने स्‍वतःच्‍या ट्विटर अकाऊंटवर हा दावा केला आहे. दुसरी खळबळजनक बाब म्‍हणजे, पुढचे टार्गेट मुंबई असल्‍याचे इंडियन मुजाहिदीनने म्‍हटले आहे. अर्थात हे ट्विटर अकाउंट याच संघटनेचे आहे की नाही, याबाबत खात्री पटलेली नाही.

बुद्धगया येथे रविवारी झालेल्या बॉम्बस्‍फोटानंतर आज (बुधवार) कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महाबोधी मंदिराला भेट दिली.

रविवारी पहाटे महाबोधी मंदिरात 10 साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्‍यानंतर बारा तासांनी @IndianMujahidin या ट्विटर अकाउंटवर '9 धमाके हमने करे' असे ट्विट करण्यात आले. 'हमारा अगला टार्गेट मुंबई है. रोक सको तो रोको, 7 डेझ लेफ्ट', अशी धमकीही इंडियन मुजाहिदीनने दिली आहे.

महाबोधी मंदिराची पाहणी केल्‍यानंतर सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शिंदे यांनी सांगितले, की गुन्‍हेगारांना पकडण्‍यात येईल. विनाकारण कोणाला त्रास देण्‍यात येणार नाही. हल्‍ल्‍याची माहिती आम्‍हाला होती. परंतु, चूक कुठे झाली, याची चौकशी करण्‍यात येईल. मंदिराची सुरक्षा सीआयएसएफला देण्‍याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे, असेही शिंदे म्‍हणाले. सोनिया गांधींनी याबाबत कोणत्‍याही प्रश्‍नाचे उत्तर दिले नाही. गृहमंत्री याबाबत बोलले आहेत, एवढेच त्‍या म्‍हणाल्‍या.

दरम्‍यान, नक्षलवाद्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांची हत्‍या करण्‍याची धमकी दिली आहे. झारखंडमध्‍ये धमकीची पत्रके लावण्‍यात आली आहेत.