आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे संदर्भात गडकरी अनुकूल : मुख्यमंत्री प्रस्ताव तयार करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर मुंबई ते नागपूर असा ९१७ िकमीचा एक्स्प्रेस वे बांधण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी अनुकूलता दाखवली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच तयार करणार अाहेत.
बुधवारी झालेल्या अायाेगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत अाले हाेते.
बैठकीनंतर गडकरी अाणि फडणवीस यांनी स्नेहभाेजनाच्या वेळी मुंबई ते नागपूर या अाठपदरी एक्स्प्रेस वेबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना माहिती दिली. त्यानंतर दिल्लीतील गडकरी वाड्यावर फडणवीस अाणि गडकरींनी मुंबई - नागपूर एक्स्प्रेस वेबाबत पाऊण तास चर्चा केली. सूत्रांनुसार, या अाठपदरी एक्स्प्रेस वेला गडकरींनीही मान्यता दिली असून मुख्यमंत्री लवकरच त्याचा प्रस्ताव तयार करणार अाहेत. मुंबई ते नागपूरपर्यंतच्या या महामार्गामुळे जवळपास ११ माेठ्या शहरांना जाेडण्यात येणार अाहे. या मार्गावर अपघात टाळण्याची अांतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरले जाणार अाहे. संपूर्ण ९१७ िक.मी. द्रुतगती मार्गावरील दुभाजकावर प्रचंड शक्तीचे संरक्षण गार्ड तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार अाहे. परंतु या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार हाेण्याला वेळ लागणार असल्याने या मार्गाला मूर्तरूप केव्हा िमळेल. ताे िकती वर्षात बांधला जाईल याबाबत आताच निश्चित सांगता येणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले की, विदर्भाचा अनुशेष भरुन काढणे अणि राज्याच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. काँग्रेसने विदर्भाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच ही स्थिती ओढावली आहे.

फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना चर्चेसाठी बाेलावून घेतले. राज्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात विराेधकांनी घातलेल्या गाेंधळाबाबत मुख्यमंत्र्यांनी शहांना कल्पना दिली. िशवसेना सातत्याने भाजप सरकारला वेठीस धरत असून मुखपत्र "सामना'तून आपल्याला व सरकारला सातत्याने लक्ष्य करण्यात येत असल्याबाबतही त्यांनी शहांना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...