आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे यांना मंत्री करणार नसाल, तर मलाही नको! गडकरींची मोदींजवळ स्पष्टोक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मंत्रिपदाचे दावेदार असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या यादीत बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे यांचे नाव सातत्याने पुढे होते. परंतु नरेंद्र मोदी यांनी मुंडे यांना तुम्ही महाराष्ट्राची धुरा सांभाळू इच्छिता तर मग मंत्रिपदाचा आग्रह कशासाठी धरता, असे सांगितल्याने मुंडे निराश झाले. लगोलग त्यांनी नितीन गडकरी यांचा वाडा गाठला. पाठोपाठ गडकरी गुजरात भवनात मोदींना भेटले आणि मुंडे उद्या शपथ घेणार नसतील, तर मीदेखील मंत्रिमंडळात येणार नाही, असे त्यांनी मोदींना स्पष्टच सांगितले.
गडकरी यांच्या या शिष्टाईमुळे मुंडे यांचे मंत्रिपद जाता जाता वाचले आणि त्यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व मुंडे मागत आहेत. मोदी लाटेत राज्यात महायुतीची सत्ता आली तर आपण मुख्यमंत्री होऊ असा त्यांचा होरा आहे. हाच धागा पकडत मोदी यांनी मुंडे यांना तुम्ही राज्याकडे लक्ष द्या. मग केंद्रात मंत्रिपद कशाला हवे, असे त्यांना सुनावले. त्यावर मुंडे नाराज झाले. काहीही न बोलता ते थेट गडकरी यांच्या दिल्लीतील घरी गेले. दरम्यान, सोमवारी मुंडेदेखील शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे.
ट्रान्सपोर्ट खाते
यात रेल्वे, रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाज व नागरी उड्डयन हे विभाग
कृषी खाते
यात रासायनिक खते, अन्न प्रक्रिया, नागरी पुरवठा या विभागांचा समावेश.