आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Munde Spent Rs 8 Cr On Poll Campaign, NCP Wants EC To Act

मुंडेंना निवडणूक लढविण्‍यावर बंदी घालावी- आर. आर. पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणूकीत आठ कोटी रुपये खर्च केल्‍याच्‍या वक्तव्‍याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी केद्र सरकारने केली आहे. मुंडेंना पुन्‍हा निवडणूक लढू देऊ नये, अशी भूमिका महाराष्‍ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी मुंडेच्‍या चौकशीची मागणी करताना सांगितले, की मुंडे यांनी 25 लाख रुपये खर्चाची मर्यादा ओलांडली असल्‍यास त्‍यांनी निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण दिले पाहिजे. मुंडे यांनी 8 कोटी रुपये खर्च केल्‍याचे सांगितले आहे. त्‍यामुळे निवडणूक आयोगानेच याची चौकशी केली पाहिजे. ही आयोगाची जबाबदारीच आहे, असे तिवारी म्‍हणाले.

गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी मुंबईतील एका कार्यक्रमात निवडणुकीचा खर्च प्रचंड वाढल्‍याचे सांगिताना स्‍वतःच्‍याच खर्चाची माहिती दिली. ते म्हणाले, मी 1980 मध्ये प्रथम आमदारकीची निवडणूक लढवली तेव्हा केवळ 29 हजार रुपये खर्च आला होता. त्यापैकी 22 हजार रुपयांचा निधी पक्षाकडून आला. मला फक्त सात हजार रुपये खर्च करावे लागले होते. मात्र गेल्या लोकसभा निवडणूकीत मला 8 कोटी रुपये खर्च करावे लागले.

मुंडेंच्‍या या वक्तव्‍यांतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रीया उमटल्‍या आहेत. राज्‍याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही मुंडेच्‍या वक्तव्‍याची चौकशी करण्‍याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने मुंडे यांना पुन्‍हा निवडणूक लढविण्‍याची परवानगीच देऊ नये, यासंदर्भात निर्णय घ्‍यावा, असेही पाटील म्‍हणाले.