आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murali Manohar Joshi News In Marathi, Narendra Modi, Varanasi

मोदी की जोशी, कुणाला काशी? वाराणसीच्या तिकिटासाठी स्पर्धा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संघाला अयोध्येनंतर आता काशी मुद्दा हवा आहे. म्हणूनच नरेंद्र मोदींना वाराणसीतून (काशी) लढवण्याचा घाट आहे. दुसरीकडे मुरली मनोहर जोशी मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत. यावरून शनिवारी वादही झाला. रविवारी जोशी अचानक म्हणाले, ‘मोदींच्या प्रतिष्ठेला मी कसा धक्का पोहोचू देईन...13 मार्चला जे ठरेल ते मला मान्य असेल.’ एकूण पाहता जोशी अजूनही ही जागा सोडण्याच्या मन:स्थितीत नाहीत आणि संघ ऐकायला तयार नाही.

संघाचे नेते सक्रिय झाले असून बंगळुरूमध्ये एका शिबिरात या नेत्यांची वक्तव्ये अत्यंत बोलकी होती. नेते म्हणाले, ‘भाजपमध्ये अत्यंत समजुतदार लोक आहेत. प्रश्न मार्गी लागेल. यापूर्वीही (अडवाणी प्रकरणात) हाच अनुभव आहे. प्रश्न सुटतीलच.’

राजकीय अपरिहार्यता की अजेंड्यावर ‘काशी’!
धार्मिक समीकरण
अयोध्येनंतर मोदींच्या माध्यमातून संघ हिंदुत्वाच्या मुद्द्याला वाराणसीतून नवा आधार देऊ इच्छित आहे. बाबरीप्रमाणेच संघ आता ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा वापरू शकतो.

राजकीय समीकरण
भाजपची पूर्वांचलच्या 32 जागांवरही नजर. 1998 मध्ये 24 जागा जिंकणार्‍या भाजपकडे सध्या या भागात केवळ 4 जागा आहेत. मोदींमुळे यूपी-बिहारमध्ये वातावरण निर्माण होईल.

जातीय समीकरण
मतांचे धु्रवीकरण हा पण संघाचा हेतू. वाराणसीत सुमारे 4 लाख मुस्लिम मतदार. तर, ब्राह्मण, वैश्य आणि दलितांची 8.50 लाख मते आहेत. जोशींपेक्षा मोदी येथे प्रभावी ठरतील.

लाटेवर स्वार वाराणसीचे मतदार
वाराणसीत ‘लाट’च प्रभावी ठरली आहे. काँग्रेसला गांधी-नेहरू कुटुंबाच्या लाटेने तारले तर भाजपला हिंदुत्वाच्या लाटेने...

1952 ते 67 कॉंग्रेस
1971 कॉंग्रेस
1980 कॉंग्रेस
1984 कॉंग्रेस
2004 कॉंग्रेस

सर्वच पक्षांना संधी
1967 सीपीएम (काँग्रेसविरोधी लाट)
1975 जनता पक्ष (आणीबाणीविरुद्ध)
1989 जनता दल (व्ही.पी. सिंह लाट)
1991 भाजप
1996 भाजप
1998 भाजप
1999 भाजप
2009 भाजप