आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pregnant सेक्रेटरीच्या हत्येनंतर फरार झालेला आरोपी 16 वर्षांनी अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने खुनाच्या आरोपातील एका आरोपीला अटक केली आहे. 1999 मध्ये जामीन मिळाल्यापासून तो फरार होता. बनावट वकील बनून हा व्यक्ती जीवन जगत होता. सध्या 53 वर्षे वय असलेला आरोपी विपिन कुमार उर्फ विपिन खन्ना उर्फ विनायक कुमार याने त्याच्या गर्भवती असलेल्या सेक्रेटरीची हत्या केली होती. त्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सेक्रेटरी त्याच्याच बाळाची आई होणार होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाप विपीनला गुरुवारी दिल्लीतून अटक करण्यात आली. 1995 मध्ये पंजाब हायकोर्टाने त्याला दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टातून जामीन मिळवला होता. त्यावेळपासून तो फरार होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, कुमार निजामुद्दीन स्टेशनजवळ येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पंजाब पोलिसांनी या प्रकरणी आमची मदत मागितली होती. पंजाब पोलिसांना या प्रकरणात 7 मे रोजी कोर्टात अहवाल सादर करायचा होता. हायकोर्टाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती. त्याला 6 मे रोजीच अटक करण्यात आली.

प्रकरण काय?
1990 मध्ये विपीन कुमारने लुधियाना येथील त्याच्या वडिलांच्या स्टीलच्या भांड्यांच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. त्याने एक सेक्रेटरी नियुक्त केली होती. तिच्याशी त्याचे संबंध हळूहळू वाढत गेले. ती सेक्रेटरी आपल्या बाळाची आई होणार हे जेव्हा त्याला समजले तेव्हा 1995 मध्ये त्याने चालक अमरजित याच्या मदतीने तिची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी विपिन, अमरजीत आणि कुमार यांचे वडील रामलाल यांना अटक केली होती. 1998 मध्ये सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. रामलाल यांचा तुरुंगात मृत्यू झाला होता. विपिन कुमारने पुढच्याच वर्षी पंजाब हाईकोर्ट अपील केले. अपिल पेंडींग असल्याने सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तो कुटुंबासह दिल्लीला गेला. त्यानंतर तो सातत्याने जागा बदलत होता. सध्या तो विनायक कुमार नावाने दिल्लीच्या शालिमार बाग परीसरात राहत होता.