आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Musharraf Said Masood Azhar Behind Pathankot Terror Attack

मुशर्रफ म्हणाले- पठाणकोट हल्ल्यात आर्मी-ISI नाही, मसूदच जबाबदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवेझ मुशर्रफ (फाइल फोटो) - Divya Marathi
परवेझ मुशर्रफ (फाइल फोटो)
नवी दिल्ली - पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी लष्कर किंवा गुप्तचर संस्था 'आयएसआय'चा हात असल्याचे आरोप पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि माजी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी फेटाळले आहेत. ते म्हणाले, आमच्या देशाची सेना दोन्ही देशांदरम्यान शांतता राखण्याचा 100 टक्के प्रयत्न करते.

मसूद अझहरवर काय म्हणाले मुशर्रफ
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ म्हणाले, मसूद अझहरने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मोकळे फिरू देऊ नये. पाकच्या माजी राष्ट्रपतींनी आरोप केला, की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी गंभीर नाहीत. ते केवळ दिखावा करत आहेत.

अझहरवर का नाराज आहे मुशर्रफ
- मसूद अझहरवर आरोप आहे, की त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने मुशर्रफ यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता.
- या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती.

केव्हा झाला होता पठाणकोट हल्ला
- या वर्षाच्या सुरुवातीला 2 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. यात 7 जवान शहीद झाले.
- 36 तास एन्काउंटर आणि तीन दिवस कोम्बिंग ऑपरेशन चालेल होते.
- हल्ल्याचा मास्टरमाइंड जैश-ए-मोहम्मदचा चीफ मौलाना मसूद अझहर होता.