आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Musician Arrested After Sexually Assaulted An Actress At Greater Kailash Hotel

अभिनेत्रीवर बलात्काराच्या आरोपात संगीतकार अटकेत, भेटीसाठी बोलावले होते हॉटेलमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: प्रतिकात्‍मक

नवी दिल्‍ली - मुंबईमध्ये प्रोडक्शन हाऊस चालवणा-या एका अभिनेत्रीने अंकुर शर्मा नावाच्या एका संगीतकारावर बलात्काराचा आरोप लावला आहे. अंकुरने दिल्लीच्या ग्रेटर कैलाश हॉटेलच्या एका खोलीत विनयभंग केल्याचे या महिलेने सांगितले. पोलिसांनी अंकुरला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी 20 दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसेच हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपीच्या डीएनएचे सँपलही घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले.

काय आहे प्रकरण?
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, ती एका कामाच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी हॉटेलमध्ये आली होती. अंकुर प्रोडक्शनच्या कामासाठी चर्चा करण्यासाठी त्यांच्या खोलीत आला होता. काही वेळाने त्याने छेड काढण्यास सुरुवात केली. अभिनेत्रीने विरोध केला तेव्हा त्याने आक्रमकपणे बळजबरी सुरू केली. नंतर या महिलेने हॉटेल कर्मचा-यांना सांगितले त्यावेळी त्यांनी या अभिनेत्रीचा बचाव केला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अभिनेत्रीची वैद्यकीय तपासणीही केली.

आरोपीचा नकार
अंकुर शर्माने या अभिनेत्रीचे आरोप फेटाळले आहेत. या अभिनेत्रीशी हिमाचल प्रदेशमध्ये एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती असे त्याने पोलिसांना सांगितले. अंकुर हा दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या द्वारका परिसरात राहतो.