आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Leaders Meet PM Modi, Assured Of Full Support

मुस्लिमांना पूर्ण सहकार्य करण्याचे मोदींचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुस्लिम समाजाचा आर्थिक, सामाजिक विकास तसेच त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. धार्मिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्याचे आश्वासन कायम राखण्यासाठी एकत्र काम करण्याचा शब्दही मोदींनी दिला. मुस्लिम नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. मुस्लिम नेत्यांनी समाजासमोरील प्रश् तरुण तयार होतील. तरुणांच्या क्षमतेचा उपयोग देशाच्या जडणघडणीत चांगल्या प्रकारे होऊ शकतो, असे पंतप्रधान म्हणाले.

बैठकीत धार्मिक तणाव, राष्ट्रीय एकात्मकता वाढत्या दहशतवादी घटनांचाही उल्लेख झाला. दहशतवादाच्या वाढत्या घटना गंभीर असून त्याचा मुकाबला एकत्रित प्रयत्नातूनच केला पाहिजे. या शिष्टमंडळात सय्यद सुलतान उल हसन चिश्ती मसिब (सज्जाद निशान अजमेर शरीफ), हजरत गुलाम यासिन साहिब (वाराणसी), शेख वसीम अशर्फी (इमाम, तंजीम, मुंबई) मोहम्म हामिद (राष्ट्रीय अध्यक्ष, इमाम तंजीम नागपूर) इतर मान्यवर उपस्थित होते.

अल्लामा साहिब(उत्तर प्रदेश), सय्यद अब्दुल रशीद अली, मौलाना अबु बक्र(नागौरी, शरीफ दर्गा राजस्थान) सय्यद अली अकबर (चेन्नई), हाजी अब्दुल हफीज खान(खासदार,बालाघाट,) आदी नेत्यांचा समावेश होता.

(फोटो - मुस्लिम समुदायातील नेत्यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.)