आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Population Increases 24 Percentage By 10 Years

मुस्लिम लोकसंख्येत दहा वर्षांत २४ टक्क्यांनी वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुस्लिम समुदायाच्या लोकसंख्येत सरासरीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे एका अहवालावरून स्पष्ट झाले. २००१ ते २०११ दरम्यान लोकसंख्या वाढीचा टक्का २४ वर पोहोचल्याचे सांगण्यात आले. वास्तविक, समुदायाची राष्ट्रीय लाेकसंख्या वाढ मात्र केवळ १८ टक्के एवढी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मुस्लिम समुदाय एकूण लोकसंख्येत १३.४ टक्के एवढा आहे, परंतु दहा वर्षांतील वाढीमुळे आता तो १४.२ टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. या अगोदर ही वाढ १९९१ आणि २००१ च्या दरम्यान झाल्याचे पाहायला मिळते. त्या वेळी देशपातळीवर ही २९ टक्क्यांनी वाढली होती.

परंतु सरासरी वाढीच्या तुलनेत टक्का वाढीची मात्र ही (२००१-२०११) पहिलीच वेळ आहे. सरकारी दप्तरी आकडेवारी नमूद आहे.त्यासंबंधीचा एक अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो लवकरच जाहीर केला जाईल, असे गृह विभागाच्या सूत्रांनी सांगितले.