आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुजफ्फरनगर - मुजफ्फरनगर दंगलीत बनावट व्हिडीओ अपलोड प्रकरणात अटकेतील भाजप आमदार संगीत सोम यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत(एनएसए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोम यांना एनएसएअंतर्गत ताब्यात घेण्यात आले असून उराई जिल्हा कारागृहात त्यांना वॉरंट बजावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिली. सोम यांनी बनावट व्हिडीओ अपलोड केला होता तसेच चिथावणीखोर भाषण केल्यामुळे धार्मिक तेढ निर्माण झाल्याचा आरोप आहे. धार्मिक दंगल प्रकरणात मुजफ्फरनगर न्यायालयाने बुधवारी 16 राजकीय, सामाजिक नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट बजावले होते.
यामध्ये सोमव्यतिरिक्त बसपाचे कदीर राणा, भाजपचे आमदार भारतेंदू सिंग, बसपाचे आमदार नूर सलीम, मौलाना जमील, कॉँग्रेसचे नेते सईदुझमन आणि बीकेयूचे प्रमुख नरेश टिकैत यांचा समावेश आहे.
दंगलीतील बळींची संख्या 49
मुजफ्फरनगर दंगलीतील बळींची संख्या 49 वर पोहोचली असून दंगलग्रस्त भागात 14 ठिकाणी पोलिस चौक्या स्थापन करण्यात आल्या आहेत. धार्मिक दंगली 49 ठार तर 12 जण बेपत्ता असून आठ धार्मिक स्थळांचे नुकसान झाले. जिल्ह्यात 33 अतिरिक्त पोलिस चौक्या उभारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी इंदरमणी त्रिपाठी यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.