आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muzaffarnagar Riots News In Marathi, Supreme Court Verdict, UP Govt

मुजफ्फरनगर दंगलः \'मानवाधिकारांचे रक्षण करण्यात युपी सरकार अपयशी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुजफ्फरनगरमधील नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करण्यात उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे, असे ठपका सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) ठेवला. या दंगलीत सुमारे 60 जण मृत्युमुखी पडले होते. दरम्यान, अखिलेश यादव यांनी दंगलीची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने सोईस्कर दुर्लक्ष केल्याने दंगल आणखी भडकली, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. परंतु, या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा विशेष चौकशी समिती यांच्याकडून तपास करण्याची गरज नाही, असेही मत नोंदविले आहे.
जनहित याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले, की दंगलीदरम्यान सामूहिक बलात्कार करण्यात आलेल्या महिलांना पोलिस संरक्षण देण्याची गरज आहे. दंगलीसाठी जबाबदार असलेल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय प्रभावाचा विचार न करता लगेच अटक करण्यात यावी.
जाट समाजाचे दोन व्यक्ती आणि मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीची हत्या झाल्यावर उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये दंगली भडकल्या होत्या. काही राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी चिथावणीखोर भाषणे करून दंगल भडकाविली होती. त्यामुळे मुजफ्फरनगरमधील अनेक गावांमध्ये काही दिवस हत्यासत्र सुरू होते.
मुजफ्फरनगर दंगल पीडित अजूनही राहतात मदत शिबिरांमध्ये... वाचा पुढील स्लाईडवर