नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवारी) दुपारी पाच दिवसांच्या जपान दौरा आटोपून मायदेशी परतले. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोदींचे स्वागत केले. जपान दौरा यशस्वी झाल्याचे समाधान मोदींनी व्यक्त केले आहे.
आपल्या देशाला जपानने मैत्रीचा हात दिला आहे. विशेष म्हणजे जपानने भारतीय एअरोनॉटिक्स लिमिटेडसह एकूण सहा कंपन्यांवरील निर्बंध हटवण्याचाही निर्णय घेतला आहे. 1998 मधील अणु चाचणीनंतर जपानने भारतीय कंपन्यांवर निर्बंध घातले होते. जपानच्या निर्णयाने मोदी यांनी स्वागत केले आहे.
जपानने भारताला पाच वर्षांत 34 बिलियन डॉलर्सची मदत देण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे भारताच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. दोन्ही देशांनी संरक्षण व अन्य लष्करी क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत मोदींनी जपानसोबत पाच करार केले आहेत.