आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Mother Was Courages, Why Committed Suicide? Sunda's Son Claimed

माझी आई खंबीर होती, आत्महत्या का करेल ? ,सुनंदांच्या मुलाचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शिव मेननने पहिल्यांदा मन मोकळे केले. माझी आई खंबीर महिला होती. ती कधीही आत्महत्या करू शकत नाही, असे शिवने म्हटले आहे.
सुनंदांचे दुसरे पती सुजित मेनन यांचा मुलगा 21 वर्षांचा शिव म्हणाला, कधीकधी मतभेद होत. पण आपली आई व शशी थरूर यांच्यात अतूट प्रेम होते. मेहर प्रकरणातील मीडियातील बातम्यांचा दबाव, असह्य तणाव व औषधे घेण्यात गोंधळ उडाल्याने तिचा मृत्यू झाला. आपल्या आईने शांततेत शेवटचा श्वास घेतला, झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याचेही शिवने सांगितले.