आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mygov Online Portal News In Marathi, Narendra Modi

जनता व सरकारमधील मोदींचा संवाद सेतू लाँच; वाचा, असे असेल ई-व्यासपीठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार ला शनिवारी 60 दिवस पूर्ण झाले. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाबद्दल जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्याच्या दृष्टीने एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. केंद्र सरकारने सुरू केलेली mygov.nic.in ही वेबसाईट पंतप्रधानांनी लाँच केली.
गंगा नदी शुद्धीकरण आणि कौशल्य विकासासारख्या गंभीर मुद्दय़ांवर जनतेची मते या वेबसाईटवर मागवण्यात आली आहेत. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, देशात सुशासन नांदावे या दृष्टीने ही वेबसाईट भारतीय नागरिकांना अधिकारसंपन्न बनवेल. लोकशाहीचे यश जनतेच्या सहभागाशिवाय अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

भूतकाळात सरकार आणि जनता यात खूप मोठे अंतर होते. गेल्या साठ दिवसांत मात्र केंद्र सरकारला आलेले अनुभव वेगळे आहेत. अनेक लोक राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान देण्यास उत्सुक आहेत. त्यांना केवळ संधी देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीपुरती जनता व सरकार अशी भागीदारी चालणार नाही. ती सतत चालू राहील, अशी हमी मोदींनी दिली. या वेळी माहिती-तंत्रज्ञान व कायदा मंत्री रविशंकर प्रसाद तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘ग्रेट गव्हर्नन्स विथ अवर पार्टनरशिप’ या शीर्षकाचीएक व्हिडिओ फिल्म या वेळी लाँच करण्यात आली.

> वेबसाइटच्या माध्यमातून लोक विकासाच्या मुद्दय़ावर आपले विचार मांडू शकतील.
> ग्रुप आणि कॉर्नर असे या वेबसाइटवर प्रमुख विभाग असतील. यावर गंगा शुद्धीकरण, महिला शिक्षण, स्वच्छ भारत, अशा विविध विभागांत मते मांडता येतील.
> कोणत्याही विषयावर मत मांडले तरी त्याची गंभीर दखल घेऊन विचारविनिमय केला जाणार आहे.
> नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटर (एनआसी) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग या वेबसाइटचे व्यवस्थापन करेल.
(फोटो: सरकारच्या अधिकृत पोर्टलचे कळ दाबून उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी.)