आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N Srinivasan Must Step Down For Free And Fair Probe In IPL Spot Fixing Scandal: SC

BCCIने प्रथम अंतर्गत सफाई करावी, श्रीनिवासन दोन दिवसांत पद सोडा -कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या माजी न्यायाधीश मुकुल मुदगल समितीच्या अहवालावर आज (मंगळवार) दुसरी सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे सांगितले. त्यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चौकशी शक्य नसल्याचे मत कोर्टाने नोंदवले. यावेळी कोर्टाने कडक शब्दात बीसीसीआयला सुनावले. श्रीनिवासन यांनी दोन दिवसांमध्ये राजीनामा दिला नाही, तर कोर्टाला आदेश द्यावा लागेल. ते जोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत बीसीसीआयच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकण्यास कोर्टाने नकार दिला.
हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाचे माजी न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्या अहवालावर सुप्रीम कोर्टाने सांगितले, की अहवालात गुरुनाथ मयप्पनला दोषी ठरविण्यात आले आहे. बीसीसीआयचे वकील याबद्दल त्यांची भूमिका मांडतील.
सुत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयचे वकील गुरुनाथ मयप्पनला दोषी ठरवत त्याच्यावर चेन्नई सुपरकिंग्जला कारवाईची परवानगी देण्याची मागणी कोर्टाकडे करु शकतात.
काय आहे प्रकरण
2013 मध्ये आयपीएल- 6 दरम्यान राजस्थान टीमच्या खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचे उघड झाले. या प्रकरणाच्या चौकशीत चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकारी आणि बीसीसीआचे प्रमुख श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांचेही नाव पुढे आले. ऑक्टोबर 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाचे माजी न्यायाधीश मुकुल मुदगल यांची समिती स्थापन केली. या समितीच्या अहवालात अनेक जणांवर गंभीर आरोप असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, असा झाला फिक्सिंगचा खुलासा