आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N Sriniwasan Says, Will Keep Out Of Ipl Matters If Elected Bcci President

BCCI च्या अध्यक्षपदी निवड झाल्यास \'IPL\'मध्ये ढवळाढवळ करणार नाही- श्रीनिवासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यास आपण इंडियन प्रीमिअर लीगमध्ये(आयपीएल) कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नसल्याचे एन.श्रीनिवासन यांनी म्हटले आहे. श्रीनिवासन यांना या संदर्भात एक हमीपत्र बुधवारी सुप्रीम कोर्टात सादर केले.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आपल्या निवडीसाठी सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यास या द्वीसदस्यीय समितीकडून 'क्लीन चिट' मिळेपर्यंत आयपीएलमध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे श्रीनिवासन यांनी कोर्टात दिलेल्या हमीपत्रात म्हटले आहे.

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाशी श्रीनिवासन यांच्या हितसंबंधाच्या चौकशीसाठी दोन तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाने यापूर्वी सुचवले होते. त्यास श्रीनिवासन यांनी यावेळी सहमती दर्शवली. एवढेच नाही तर द्वी सदस्यीय समितीला आपण पूर्ण सहकार्य करणार आहे. तसेच दोषी आढळल्यास आपल्यावर कोर्टाने कारवाई करावी, असे श्रीनिवासन यांनी मत मांडले आहे.
दरम्यान, आयपीएलमधील बहुचर्चित स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीनिवासन यांचे नाव आल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून त्यांना पायउतार व्हावे लागले होते. नंतर न्यायमूर्ती मुकुल मुद्गल समितीने 'क्लीन चिट' दिल्याने अध्यक्षपदी पुन्हा आपली निवड करण्यात यावी, अशी मागणी श्रीनिवासन यांनी केली आहे.