आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Distrist BJP Activist Throw Ink On Arvind Kejriwal

नगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याने अरविंद केजरीवालवर फेकली शाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत सोमवारी अहमदनगर जिल्हय़ातील नचिकेता वाल्हेकर या भाजप कार्यकर्त्याने सोमवारी गोंधळ घातला. केजरीवालांसह प्रशांत भूषण व मनीष शिसोदिया यांच्यावर त्याने काळी शाई फेकली. अण्णा हजारे झिंदाबादच्या घोषणाही त्याने दिल्या. पोलिसांनी नचिकेता यास अटक केली आहे.
नचिकेता वाल्हेकर कोण?
पारनेर तालुक्यातील नारायणगावचा नचिकेता वाल्हेकर स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवतो. त्यासाठी लग्न केले नसल्याचाही त्याचा दावा आहे. वाडेगव्हाण गटातून 2011 मध्ये भाजपतर्फे त्याने जि.प. निवडणूकही लढवली होती.
निषेध म्हणून शाई फेकली
आंदोलनात केजरीवालांनी अण्णांचा वापर केला. लोकपालचा लढा अण्णांचा, पण केजरीवाल त्यातून राजकीय स्वार्थ साधत आहेत. त्याचा निषेध म्हणून मी शाई फेकली.’
नचिकेता वाल्हेकर, भाजप कार्यकर्ता.