आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रश्नांतून कळेल वादाचे मूळ; करार फक्त फॉर्म्युला : जेलियांग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर मुख्यमंत्री - Divya Marathi
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर मुख्यमंत्री
नवी दिल्ली - नागा शांतता कराराच्या ऐतिहासिक घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. करार कसा लागू होईल? गृह आणि संरक्षण मंत्रालयांना याची माहिती नाही, असे सांगण्यात येते. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर नागालँडचे मुख्यमंत्री टी.आर. जेलियांग म्हणाले, हा अंतिम कराराचा केवळ फॉर्म्युला आहे. कराराचा परिणाम होणारी तीन राज्ये आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाईल.

केंद्राने गेल्या सोमवारी नॅशनलिस्ट सोशलिस्ट काैन्सिल ऑफ नागालँडच्या(एनएससीएन) इसाक मुईवा गटाशी शांतता करारावर स्वाक्षरी केली होती. यानंतर तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारवर मनमानी केल्याचा अारोप ठेवला आहे. आपणाला विश्वासात घेतले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही ही कृती म्हणजे मोदी सरकारचा अहंकार असल्याचे सांगितले.
या प्रश्नांतून कळेल वादाचे मूळ :

{ आसाम, मणिपूर आणि अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांकडून का विरोध होतोय?
बंडखोर दीर्घकाळापासून नागा लोकसंख्येसाठी स्वायत्त "वृहद नागालिम'ची मागणी करत आहेत. नागालँडसोबत आसाम, अरुणाचल आणि मणिपूरमध्येही नागा लोकसंख्या आहे. करारामुळे आपली जमीन घेऊन नागालँडला दिली जाईल, अशी तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भीती वाटते. त्यामुळे त्यांनी एक इंचही जमीन देणार नसल्याचे म्हटले आहे.
{ केवळ एका संघटनेशी करार पुरेसा आहे?
केंद्राने एनसीसीएनशी(आयएम) करार केला आहे. एनएससीएन(खपलांग) गटाने युद्धबंदीचे उल्लंघन करत लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करून १८ सैनिकांची हत्या केली होती. जेलियांगनुसार, खपलांग गटाचे प्रमुख एसएस खापलांग यांना भेटण्यास १६ सदस्यीय शिष्टमंडळ म्यानमारला जाईल. गृह मंत्रालयाकडून त्यास परवानगी मिळाली आहे.

{ करारानंतर बंडखोर काय करतील?
राजकारणात येतील. याआधीही तसे झाले आहे. नवीन प्रक्रिया सुरू होण्यासाठी सर्वमान्य तोडगा निघाल्यास नागालँड विधानसभेत सर्व सदस्यांचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे जेलियांग यांनी सांगितले आहे. जेलियांग यांचा नागा पीपल्स फ्रंट केंद्राच्या रालोआ सरकारमध्ये सहभागी आहे.

{ नागा करारामुळे बिगरनागा लोकसंख्येचे काय होईल?
करारामुळे ईशान्य राज्यात शांतता निर्माण होईल, असा जेलियांग यांचा दावा आहे.
यामुळे बिगरनागा लोकसंख्येवर परिणाम होणार नाही. केंद्र सरकार आणि एनएससीएन-आयएमच्या कराराकडे बिगरनागा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाहू नये.