आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभाविपच्या कार्यकर्त्याने नजीबवर केला होता हल्ला, जेएनयूच्या चौकशी समितीचा निष्कर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता विक्रांत कुमार याने भांडणादरम्यान नजीब अहमद या विद्यार्थ्यावर हल्ला केला होता. त्यानंतरच नजीब बेपत्ता झाला आहे, असा निष्कर्ष जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) समितीने काढला आहे.

नजीब (२७) हा स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी असून तो उत्तर प्रदेशमधील बदायूंचा रहिवासी आहे. त्याचे १४ ऑक्टोबरच्या रात्री विक्रांत कुमार तसेच अभाविपच्या इतर कार्यकर्त्यांशी विद्यापीठ परिसरात भांडण झाले होते. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून तो बेपत्ता झाला आहे. जेएनयूने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. याबाबतच्या अहवालात म्हटले आहे की, विक्रांत कुमारने १४ ऑक्टोबरला नजीबला मारहाण केल्याचे आढळले तसेच त्याच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरली. ही बेशिस्त आणि गैरवर्तणूक आहे. तुमच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का सुरू करण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण द्यावे, असे विक्रांतला विचारण्यात आले आहे.

अभाविपने मात्र विक्रांतची बाजू घेतली असून, चौैकशी करताना विद्यापीठ प्रशासनाने ‘पक्षपाती’ भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. अभाविपचे कार्यकर्ते आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे सदस्य सौरभ शर्मा म्हणाले की, घटनेच्या वेळई उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांची साक्ष घेण्यात आली. एवढेच नव्हे तर विद्यापीठ प्रशासनही डाव्यांचे वर्चस्व असलेल्या विद्यार्थी संघटनेची बाजू घेत आहे.

महिना उलटून गेल्यानंतरही बेपत्ता नजीबचा शोध घेण्यात अपयश आल्याने जेएनयूचे विद्यार्थी आणि प्राध्यापक विद्यापीठ प्रशानस आणि दिल्ली पोलिसांच्या विरोधात आंदोलन करत आहे. नजीबच्या आईच्या नेतृत्वाखालीही याआधी विद्यार्थी संघटनांनी राजधानी दिल्लीत आंदोलन केले होते.
बातम्या आणखी आहेत...