आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namo Sister Will Not Include The Pledge, Umar Said, Did Not Invite

सोनिया - राहुल शपथविधीला उपस्थित राहाणार; चहावाल्याला निमंत्रण, ओमर यांना नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि्ल्ली - नरेंद्र मोदी 26 मे रोजी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची शपथ ग्रहण करणार आहेत. या समारंभाची युद्धपातळीवर तयारी सुरु आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या समारंभाचे निमंत्रण स्विकारले आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. बांगलादेशच्या पंतप्रधानांना निमंत्रण पाठवल्यावरुन त्या नाराज असल्याचे कळते. त्यांच्या पक्षाकडून शुक्रवारीच स्पष्ट करण्यात आले आहे, की ममता बॅनर्जी यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळे त्या येणार नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनीधी म्हणून माजी अर्थ राज्यमंत्री अमित मित्रा किंवा पक्षाचे महासचिव मुकुल रॉय समारंभात सहभागी होऊ शकतात.
दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहाणार आहेत. जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन शपथ ग्रहण सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटले आहे.
यांनाही केले निमंत्रित
- चहावाला किरण महिदा. महिदाने बडोद्यात मोदींच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली होती. तसेच नाववाला वीरभद्र निषाद यांनाही निमंत्रित केले गेले आहे.
- या समारंभासाठी यावर्षीचे पद्म पुरस्कार विजेते सर्वांना निमंत्रित केले गेले आहे.
- उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, राजनैतिक अधिकारी, माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान.
- भारतीय जनता पक्षाचे सर्व मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे जवळपास 350 सदस्य.

पुढील स्लाइडमध्ये, का झाला भोजन समारंभ रद्द