आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namo Sister Will Not Include The Pledge, Umar Said, Did Not Invite

शपथविधीसाठी चहावाल्यालाही बोलावले, ओमर यांनाही अखेर मिळाले आमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोमवारी होणा-या शपथवधी सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंकत्री ममता बॅनर्जी मात्र सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. बांगलादेशच्या पंतप्रधानांना आमंत्रण पाठवल्यामुळे नाराज झालेल्या मतता बॅनर्जी यांचे आधीच दुसरे कार्यक्रम ठरलेले असल्याचे तृणमूल काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांच्यावतीने राज्याचे अर्थमंत्री अमित मित्रा किंवा पक्षाचे महामंत्री मुकूल रॉय हे सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकतात.
दरम्यान, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्याला शपथविधीसाठी आमंत्रण मिळाले असल्याचे स्पष्ट केले आहे. मोदी आणि मुख्यमंत्री राष्ट्रपती दोघांकडूनही आपल्याला आमंत्रण मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओमर यांनी आधी आपल्याला आमंत्रित करण्यात आले नसल्याचे त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केले होते.

यांनाही आमंत्रण
- चहा विकणारे किरण महीदा. वडोद-यातून उमेदवारी दाखल करताना ते मोदींचे प्रस्तावक बनले होते. त्यांच्याबरोबरच वीरभद्र निषाद यांनाही आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
- भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांसह यावर्षी पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले सर्व सन्माननीय पाहुणेही उपस्थित राहतील.
- भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सुमारे 350 सदस्य.
- उप-राष्ट्रपती हमीद अन्सारी, राजदूत सर्व माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान.
सोमवारी होणारे प्रितीभोज का झाले रद्द...वाचा पुढे