आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nandana Sen Is An International Actress, Screenwrite

ही आहे नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांची कन्या, हॉलिवूड-बॉलिवूडमध्ये झळकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ भारतरत्न अमर्त्य सेन यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. नुकताच त्यांनी भारतातील बहुचर्चित नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आगपाखड केली होती. मोदी सरकारला देशातील सर्व शैक्षणिक संस्थावर पकड पाहिजे असे ते म्हणाले होते.

अमर्त्य सेन हे जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त divyamarathi.com त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती देत आहे. अमर्त्य सेन यांच्या पत्नी नबानिता देव सेन या प्रसिद्ध कादंबरीकार असून त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेले आहे.

अमर्त्य सेन आणि नबानिता यांची कन्या नंदना अभिनेत्री आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये तिने 'रंग रसिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले होते. हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये नंदना चमकली आहे. मात्र रंग रसियामध्ये तिने दिलेल्या बोल्ड सीन्समुळे ती चर्चेत होती. चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. यात नंदनाने मोठ्या प्रमाणात अंगप्रदर्शन केले होते. त्याबद्दल तिला एका मुलाखतीत छेडले असता तिने बोल्ड इमेजची पर्वा करत नसल्याचे म्हटले होते.

नंदनाने 2013 मध्ये पेंग्विन पब्लिशिंग हाऊसचे सीईओ जॉन मेकिंसनसोबत लग्न केले.
नंदनाने 1997 मध्ये द डॉल चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. तिच्या अभिनयाची चमक अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटातून पाहायला मिळाली आहे.

नंदनाचे चर्चित चित्रपट
'रंग रसिया'च्या आधी 'टँगो चार्ली', 'ब्लॅक', 'फॉरएव्हर', 'सेड्यूसिंग मार्या', 'द मिथ', 'द वॉर विदिन', 'मॅरीगोल्ड' आणि 'प्रिंस' सारखे चित्रपटातून ती झळकली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अमर्त्य सेन यांची कन्या नंदनाचे निवडक PHOTOS