आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाख चुका असतील केल्या; टाटा, सत्या नाडेला यांच्याकडून चुकांची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्ही १०० वेळा खूप चांगल्या बाबी केल्या तर तुमचे सर्व काही सुरळीत चालेल, मात्र एक घोडचूक केली तर ती या १०० बाबींचे चांगुलपण नाहीसे करते, असा सिद्धांत आहे. नेमकी याची प्रचिती देशातील दोन बड्या उद्योगपतींना आली आहे. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी बुधवारी आपल्या कंपनीकडून झालेल्या घोडचुकांची जाहीर कबुली दिली. या बड्या उद्योगधुरिणांनी केलेले हे आत्मपरीक्षण बहुमोल शिकवण देणारे ठरणार आहे. टाटा यांनी नॅनोच्या विक्री व विपणनात घोडचुका झाल्याची कबुली दिली. नाडेला यांनी मोबाइल क्षेत्र वाढीचा अंदाज मायक्राेसॉफ्टला बांधता आला नसल्याची घोडचूक केल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे.

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी देशाने गेल्या ६० वर्षांत संशोधन क्षेत्रात जगात उठून दिसेल असे काहीच न केल्याची खंत व्यक्त केली.
रतन टाटा
नॅनो कारबाबत प्रारंभीपासूनच अनेक चुका झाल्या.
नॅनोची विक्री, विपणन फसले
देशातील सर्वसामान्यांच्या कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किफायतशीर किमतीत नॅनो बनवली. मात्र, नॅनोच्या विक्री व विपणनात आम्ही अनेक चुका केल्या. स्वस्त कार असल्याचे ब्रँडिंग करणे ही सर्वात मोठी चूक ठरली. त्यामुळे तसेच बंगाल प्रकरणाने कारबाबत नकारात्मक संदेश गेला व विरोधकांना संधी मिळाली.
पुढील स्लाइडमध्ये, सत्या नाडेला आणि नारायण मुर्ती
बातम्या आणखी आहेत...