नवी दिल्ली- नाराज काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गुरुवारी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेत पाऊण तासभर गार्हाणे मांडले. गुरुवारी रात्री राहुल हे
सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्याकडे हा विषय मांडणार आहेत. दरम्यान, ‘राहुल यांच्यासोबतच्या बैठकीत माझ्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली नाही. सोनियांनी माझ्या शंकांचे समाधान केल्यास राजीनामा मागे घेण्याचा विचार मी करू शकतो,’ असे राणेंनी पत्रकारांना सांगितले. राज्यात मुख्यमंत्री बदलाची
आपण कधीच मागणी नव्हती, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी राणे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे एकत्रित सोनियांची भेट घेण्याची शक्यता आहे.