Home »National »Delhi» Narayan Sai Arrested Narayan Sai News In Hindi-Narayan Sai Current News

अटकेनंतरही नारायण साईच्या चेह-यावर हास्य, समर्थकांनी केली पुष्पवृष्टी

दिव्य मराठी नेटवर्क | Dec 04, 2013, 18:38 PM IST

नवी दिल्ली - जवळपास दोन महिने पोलिसांना चकमा देणारा बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी नारायण साईला दिल्ली-हरियाणा सीमेवर अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्ली आणि सुरतच्या पोलिसांच्या टीमने संयुक्तरित्या कुरुक्षेत्र जवळील पीपली येथे अटक केली आहे. नारायण साईसोबत त्याचा सहकारी हनुमान, विष्णू आणि रमेश यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण साईला दिल्लीला आणण्यात आले. दिल्ली पोलिसाच्या ताब्यातील नारायण साईची बुधवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि रोहिणी कोर्टात त्याला हजर करण्यात आले. यावेळी रोहिणी कोर्टा बाहेर मोठ्या संख्येने साईचे समर्थक हजर होते. नारायण साईचे स्वागत करण्यासाठी ते आले होते. त्यांच्या हातात फुलांचे हार होते. साईच्या समर्थकांनी त्याच्या मार्गवर फुलांचा सडा टाकला होता. त्याच्या समर्थकांचा आरोप आहे, की साईवर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत. हे त्याच्या विरुद्धचे मोठे षडयंत्र आहे.

गेल्या 15 दिवसांत साईने अनेक ठिकाणे बदलली. दिल्ली पोलिसांना सुचना मिळाली ही कुरुक्षेत्रमधील एका गोशाळेत साई लपून बसला आहे. पोलिसांनी तिथे छापा टाकण्याआधीच तो फरार झाला होता. तेथून एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याने सांगितले, की साई इको स्पोर्टसकडे गेला आहे. पोलिस त्य दिशेने गेले. मात्र तो तिथूनही फरार झाला होता. त्यानंतर साई पीपली पेट्रोलपंपावर पोहोचला. त्याला विश्वास होता तो येथेही पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होईल. मात्र तसे झाले नाही आणि अखेर तो पोलिसांच्या सापळ्यात अडकला. त्याला अटक केल्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली आणि दिल्ली पोलिसांनी त्याला रोहिणी गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले.
पुढील स्लाइडमध्ये, पीडित महिलेने फाडला साईचा बुरखा..

Next Article

Recommended