आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Sai Arrested, Narayan Sai News In Marathi

नारायण साई सुरत पोलिसांच्या कस्टडीत; गाडीत सापडले व्हियाग्रा, 6 मोबाइल हँडसेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दोन महिने पोलिसांना गुंगारा देणारा लैंगिक शोषणातील आरोपी नारायण साई पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. नारायण साईला गुरुवारी दिल्लीहून सुरतला आणण्यात आले असून चौकशीसाठी त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. चौकशीनंतर पोलिस साईला सायंकाळी सहा वाजता कोर्टात हजर करणार आहे.
मंगळवारी उशिरा रात्री नारायण साईला अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी त्याला दिल्लीच्या रोहिणी कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर 24 तासांसाठी साईला गुजरात पोलिसांच्या कस्टडीत देण्यात आले आहे. ज्या एसयुव्ही कारमधुन साईला पोलिसांनी पकडले त्यातून रोख 2.61 लाख रुपये, 6 मोबाइल व 130 सिमकार्ड जप्त करण्यात आले. कामोत्तेजक औषध व्हियाग्रा, कारमध्ये भांडीकुंडी व स्टोव्हही होता. चौकशीत साईऐवजी कारचालकच उत्तरे देत होता.

बुधवारी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातील नारायण साईची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि रोहिणी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी रोहिणी कोर्टा बाहेर मोठ्या संख्येने साईचे समर्थक हजर होते. नारायण साईचे स्वागत करण्यासाठी ते आले होते. त्यांच्या हातात फुलांचे हार होते. साईच्या समर्थकांनी त्याच्या मार्गवर पुष्पवृष्टी केली होता. त्याच्या समर्थकांचा आरोप आहे, की साईवर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत. हे त्याच्या विरुद्धचे मोठे षडयंत्र आहे.

साईला अटक केली तेव्हा तो लाल पगडी व निळ्या रंगाच्या ट्रॅकसुटमध्ये होता. जेव्हा त्याला वैद्यकीय तापासणीसाठी नेण्यात आले तेव्हा मात्र तो संताच्या वेशात होता. त्याने हात उंचावून हसत-हसत समर्थकांना अभिवादन देखील केले.
नारायण साईसह त्याचा सहकारी हनुमान, भक्त वि्ष्णू आणि चालक रमेश यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी नारायण साईची चौकशी केली. सुत्रांच्या माहितीनुसार 58 दिवस फरार असलेल्या साईने पोलिसांना सांगितले की, मला लपून राहाण्याचा सल्ला माझ्या सहका-यांनी दिला होता. साईने तो कुठे कुठे दडून बसला होता त्याचीही माहिती दिली. उत्तर प्रदेशात आगरा आणि बिहारमध्ये सीतामढी येथे त्याने मुक्कम केला होता.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कशी झाली अटक, कोणाची होती कार