आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narchy Not Take Government Position, President Said In The Eve Of Republic Day

अराजकता सरकारची जागा घेऊ शकत नाही, राष्‍ट्रपतींचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यपद्धतीवर नाव न घेता आक्षेप घेतला आहे. लोकांना आकर्षित करणारी (पॉप्युलिस्ट अनार्की) अराजकता कधीही सरकारची जागा घेऊ शकत नाही. सरकार म्हणजे ‘चॅरिटी शॉप’ नाही. जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन त्यांची पूर्तता नाही झाली तर निराशा आणि अराजकता पसरते, असे मुखर्जी म्हणाले.
65 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती मुखर्जी यांनी ही चिंता व्यक्त केली. मी निराशावादी नाही. लोकशाही असा डॉक्टर आहे, जो स्वत:च्या जखमा स्वत:च भरून काढू शकतो. काही वर्षे राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरली.
2014 वर्ष त्या जखमांना भरून काढणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचारामुळे देशाची पाळेमुळे कमकुवत होत आहेत. जनतेमध्ये असंतोष आहे, असे सांगून मुखर्जी यांनी अर्थव्यवस्थेची वाटचाल दोन वर्षांत कमी झाल्याचे म्हटले.