आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लालकिल्ल्यावरुन PM ने PAK नाही तर POK चा केला उल्लेख, गिलगिट-बलूचचे मानले आभार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लालकिल्ल्यावरुन तिसऱ्या वर्षी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधला. 94 मिनिटांच्या भाषाणात मोदींनी पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, पेशावरमधील शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यानंतर भारतीयांच्या डोळ्यांतून अश्रू निघाले होते, मात्र तिथे दहशतवादाला ग्लोरिफाय केले जाते. दुसरीकडे मोदींनी पाकव्याप्त काश्मीर POK चा एका आठवड्यात दुसऱ्यांदा उल्लेख केला.
मोदी म्हणाले- जग पाहात आहे दहशतवादाला कोण ग्लोरिफाय करत आहे
- मोदी म्हणाले, 'मी जगासमोर दोन चित्र ठेवू इच्छितो. दोन घटना सांगू इच्छितो. मी जगाला सांगतो की तुम्हीच याचे मुल्यमापन करा. पेशावरमध्ये दहशतवाद्यांनी निरपराध शाळकरी मुलांची हत्या केली. घटना पेशावरमध्ये घडली होती. दहशतवादी घटना होती. निर्दोष मुलांना गोळ्या घालण्यात आल्या होता. ज्ञान मंदिराला रक्तरंजित केले गेले होते. या घटनेने भारताच्या संसदेच्या डोळ्यात अश्रू आले होते. हा आमचा मानवधर्म आहे. भारतातील प्रत्येक मुल पेशावरच्या दुःखात सहभागी होते. दुसरीकडे दहशतवादाचे उदात्तीकरण केले जाते. निरपराध लोक मारले जातात तेव्हा आनंदोत्सव साजरा केला जातो. ही कोणती मानवता आहे ? हे जगाला चांगले कळते.'

POK-बलुचिस्तानच्या नागरिकांचे मानले आभार
- मोदी म्हणाले, 'गेल्या काही दिवसांमध्ये बलूचिस्तान, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांनी ज्या पद्धतीने मला धन्यवाद दिले आहेत. माझ्याबद्दल सद्भभावना व्यक्त केल्या. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. जी धरती मी पाहिली नाही, तेथील लोकांना कधी भेटलो नाही, ते पंतप्रधानांचा आदर करतात, हा माझ्या सव्वाशे कोटी देशवासियांचा सन्मान आहे. गिलगिट, बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांची मनापासून आभार व्यक्त करतो.'
का केला उल्लेख
- काश्मिर हिंसेवर सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी प्रथमच पीओकेचा उल्लेख केला होता.
- ते म्हणाले होते, काश्मीर तर भारताचा अविभाज्य भाग आहेच. परंतू पीओकेही आमचा आहे.
- त्यानंतर बलूचिस्तान, गिलगिट आणि पीओकेमधील लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मोदींचे कौतूक केले होते.
बातम्या आणखी आहेत...