आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Addresing Rally Latest News In Marathi

मी मागासवर्गीय, म्हणूनच प्रियंकांचा आरोप; \'नीच जाती नसते, कर्म आणि विचार असतात\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजप ‘नीच राजनीती’ करत असल्याच्या प्रियंका गांधी यांनी अमेठीत केलेल्या आरोपानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी मोदींनी उत्तर प्रदेशातील एका सभेत प्रत्युत्तर दिले. अगोदर सकाळी त्यांनी यावर तीन ट्विट केले. नंतर उत्तर प्रदेशातील सभेत ते म्हणाले, ‘मी भलेही मागासवर्गीय जातीत जन्मलो. मात्र, सर्वश्रेष्ठ भारताचे माझे स्वप्न आहे. मी चहा विकला, देश नाही. मी कधीही नीच राजकारण केले नाही.’

दरम्यान, आज (बुधवार) सकाळी राहुल गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. फुरसतगंज विमानतळावर राहुल गांधी आले असताना पत्रकारांनी त्यांना विचारले, मोदी म्हणतात मी मागास जातीतील असल्याने गांधी परिवार मला लक्ष्य करीत आहे, यावर राहुल गांधी म्हणाले, 'जात-धर्म नीच नसतात. व्यक्तीचे कर्म आणि विचार नीच असतात. क्रोध आणि रागाचे विचार हे नीच असतात.' मोदींनी लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात जातीय राजकारणाला हवा देण्याचा प्रयत्न केला तर, राहुल यांनी त्यांच्या या प्रयत्नातील हवाच काढून घेतली असल्याचे मानले जात आहे.
मोदींचे ट्विट
०मी खालच्या जातीचा, म्हणून माझे राजकारण त्यांना नीचच वाटणार.
०खालच्या जातींचा त्याग, बलिदान आणि पुरुषार्थामुळेच या देशाने विकासाचे शिखर गाठले आहे.
०याच उंचीमुळे कुप्रशासन व मतांच्या राजकारणापासून भारत मुक्त होईल