आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील प्रत्येकाला देश आपला वाटला पाहिजे, प्रगती करण्याची इच्छा पाहिजे - मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील प्रत्येक नागरिकाला हा देश आपला वाटला पाहिजे आणि प्रगती करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. नीति आयोगाच्या चॅम्पियन्स ऑफ चेंज कार्यक्रमांतर्गत मोदींनी मंगळवारी 200 हून अधिक कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. ते म्हणाले, 'समस्या आणि त्रास आहेच. मी जिथे असेल तेथून त्यावर तोडगा शोधेल. आमची शेकडो वर्षांची गुलामी पाहिली तर एकही वर्षे असे गेले नसेल की देशाच्या एखाद्या ठिकाणाहून स्वातंत्र्याची पूकार झाली नसेल.'
 
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 
 
विकासाचे जनआंदोलन झाले पाहिजे
- नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर विकासाला आम्ही जनआंदोलनाचे स्वरुप देऊ शकलो नाही. आम्हाला ठरवावे लागले की देशाला आम्हाला येथे घेऊन जायचे आहे आणि आम्ही ते करणारच. जर डॉक्टरांच्या मनात असेल की कुपोषणाची समस्या संपली पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला चाइल्ड हेल्थकेअर सुरु केले पाहिजे. जर या भावना निर्माण झाल्या तर कोण म्हणेल की देश बदलू शकत नाही. 
- मोदी म्हणाले, सरकार फक्त एका मध्यस्थासारखे काम करत राहील आणि देश प्रगती करेल. 2022 च्या स्वतंत्र भारतासाठी आम्हाला आजपासून प्रय्न करावे लागतील. त्यासाठी मला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणाहून एका आधुनिक भारताचे सैनिक बनू शकता. जगातील सामर्थ्यशाली भारताचे सैनिक बनू शकता. आम्ही सर्व एकत्र बसून एकेका समस्येचे समाधान शोधले तर बिकट वाट सोपी होत जाईल.  
 
आम्हाला दृष्टीकोणात बदलावा लागेल 
- मोदी म्हणाले, 'नोटबंदीनंतर टीव्हीवर बँकेच्या बाहेर लागलेल्या रांगा दाखवल्या जात होत्या. परंतू त्यांनी कधी यूरियासाठी लागलेल्या शेतकऱ्यांच्या रांगा दाखवल्या नाही. समस्या कशी दाखवायची त्याचा हा दृष्टीकोण आहे.'
- 'यूरिया शेतात कमी आणि कॅमिकल कंपन्यांमध्ये जास्त जात होता. आम्ही यूरियाची नीम कोटिंग केली, त्यानंतर हा यूरिया शेतीशिवाय दुसऱ्या कोणत्याच कामाचा राहिला नाही. चोरी बंद झाली. आज देशात यूरियाची कमतरता नाही.'
 
मी सांगितले होते जाहीर करा, नाही केले मग 8 नोव्हेंबर आला
- मोदी म्हणाले, मी तुकड्यांमध्ये काही करत नाही. आज काही एक म्हणालो तर लोकांना सहज कळून जाईल की मोदी कुठे घेऊन जाणार आहे. मी सांगितले होते पैसे जाहीर कार, नाही केले. मग 8 नोव्हेंबर आला. कोणतीही गोष्ट तुकड्यांमध्ये होत नाही. प्रत्येकाची एक श्रृंखला असते. 
 
आम्हाला देशाला डिजिटल इंडिया करायचे
- मोदी म्हणाले, आम्हाला डिजिटल इंडियाच्या दिशेने जायचे आहे. ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कवर काम सुरु आहे. 360 गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहोचले, 3 वर्षात आम्ही लाखो गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क घेऊन जाऊ. आम्हाला कॅशलेस सोसायटीच्या दिशेने जायचे आहे. 
- मोदींनी सीईओंना आवाहन केले की भीम अॅप डाऊन लोड करा. तुमच्या कंपनीची दिशा देशाला कॅशलेसकडे घेऊन जाणारी असली पाहिजे. संपूर्ण व्यवहार, कामगारांचे काम डिजिटल झाले पाहिजे. कॅशलेज व्यवहार करा. देशाची सेवा होईल.  
बातम्या आणखी आहेत...