आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त निवेदनात पाकिस्तानच्या दहशतवादाचा उल्लेख, हे आहेत 10 मुख्य मुद्दे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. - Divya Marathi
भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकन दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी भारताला दोन महत्वपुर्ण बाबींवर यश प्राप्त झाले. अमेरिकेने हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. दुसरी बाब म्हणजे मोदी आणि ट्रम्प यांच्या संयुक्त निवेदनात पाकिस्तानचा उल्लेख आला. ज्याची अपेक्षा करण्यात येत नव्हती. निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका पाकिस्तानला सांगू इच्छितात की दुसऱ्या देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या भूभागाचा वापर होऊ देऊ नये. तत्पूर्वी मोदी यांनी ट्रम्प यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या कुटुंबीयांसमवेत भारत दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले.
 
मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त निवेदनातील 10 प्रमुख मुद्दे

1) पाकिस्तानने दहशतवादास पायबंद घालावा
- संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देश पाकिस्तानला हे सांगू इच्छितात की आपल्या भूभागाचा वापर दुसऱ्या देशात दहशतवाद पसरविण्यासाठी या देशाने होऊ देऊ नये. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आणि पठाणकोट येथील हल्ल्यातील दोषींवर कारवाई करावी.

2) भारत-अमेरिकेच्या संबंधावर काय म्हणाले
- ट्रम्प म्हणाले, भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारत आणि अमेरिकेत संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अत्यंत मुहत्वपुर्ण आहे. दोन्ही देशांनी दहशतवादास लगाम घातला आहे. दोन्ही देश दहशतवादी संघटना आणि कट्टरतावादी विचारसरणी संपविण्यासाठी कटिबध्द आहेत. कट्टर इस्लामिक दहशतवाद आम्ही संपवू.

3) पंतप्रधान मोदींचे मानले आभार
- ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे अमेरिकेच्या दौऱ्यावर आल्याबद्दल आभार मानले. भारत आणि भारतीयांविषयी आमच्या मनात आदर आहे. मी प्रचारादरम्यान भारताचा उल्लेख खरा मित्र असे केले होते. भारतीय संस्कृती आणि परंपरांचा मी आदर करतो.
- जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश असणाऱ्या भारतीय पंतप्रधानांचे स्वागत केल्याने मला सम्मानित झाल्यासारखे वाटत आहे. मी आणि मोदी सोशल मीडियातील वर्ल्ड लीडर्स आहोत. मी प्रचारादरम्यान भारताचा उल्लेख खरा मित्र  असा केला होता आणि तेच सत्य असल्याचे सिध्द झाले आहे.
- मोदी यांनी माझी मुलगी इवान्का हिला अमेरिकेच्या शिष्टमंडळासह भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. मला वाटतंय तिने ते निमंत्रण स्वीकारले आहे. 
 
# नरेंद्र मोदी
4) भारताविषयी भावना मांडल्याबद्दल मानले आभार
- मोदी म्हणाले, अमेरिकेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प, उपाध्यक्ष यांच्या सर्वांचे मी आपण केलेल्या स्वागताबद्दल आभार मानतो. आपण भारताबद्दल ज्या भावना मांडल्या त्याबद्दलही आभार मानतो. इवान्का यांना अमेरिकेच्या शिष्टमंडळासह भारतात येण्याचे निमंत्रण दिले आणि ते स्वीकारले आहे. त्यांच्या भारत दौऱ्याची आम्ही वाट पाहत आहोत.

5) दोन्ही देशांच्या इतिहासातील हा दौरा महत्वपुर्ण भाग
- हा दौरा आणि ही चर्चा दोन्ही देशातील इतिहासाचा महत्वपुर्ण भाग आहे. दोन्ही देशातील ही चर्चा विश्वासावर आधारित आहे. 

6) भारत आणि अमेरिका विकासाचे जागतिक इंजिन
- भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश विकासाचे जागतिक इंजिन आहे. दोन्ही देशांचा सर्वांगिण आणि एकत्रित विकास हे आमचे लक्ष्य आहे आणि यापुढेही राहील.

7) दहशतवादमुक्ती हे प्राथमिक लक्ष्य
- दहशतवादाचे जागतिक आव्हान हे आमचे प्राथमिक लक्ष्य आहे. बैठकीत दहशतवाद, अतिरेकी विचारसरणी आणि कट्टरतावाद यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवरही चर्चा करण्यात आली. दहशतवादाशी लढतानाच त्याला सुरक्षित लपण्याच्या जागा नष्ट करणे हे आमच्या संयुक्त भागीदाराचे मुख्य लक्ष्य असेल. आम्ही गुप्त माहितीची देवाण-घेवाण वाढविणार आहोत. रणनितीचा समन्वयही आम्ही मजबूत करणार आहोत. 
 
8) अमेरिकेने भारताची संरक्षणसिध्दता वाढवली
- सुरक्षेविषयी आव्हानांवर आम्ही चर्चा केली. अमेरिकेने भारताची संरक्षणसिध्दता वाढवली आहे. सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी सहकार्य वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दोन्ही देशांसाठी संरक्षणाविषयी तंत्रज्ञानाबरोबरच व्यापार आणि उत्पादन क्षेत्रातील सहकार्य लाभदायक असेल. 

9) अफगाणिस्तानातील भारताची भूमिका
- अफगाणिस्तानातील अस्थिरता आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्या देशाच्या पुर्नउभारणीत भारताने महत्वपुर्ण भूमिका बजावली आहे. आम्हाला त्यासाठी अमेरिकेचे सहकार्य हवे आहे. 

10) भारतात स्वागताची संधी द्या
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकार्याबद्दल आभार मानताना पंतप्रधान मोदींनी त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. भारतात स्वागताची संधी द्या अशी विनंती ट्रम्प यांना केली.
 
हेही वाचा 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...