आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi And Rahul Gandhi To Clash In Upcoming Loksabha Polls

2014 लोकसभा निवडणुकीत मोदी-राहुल येणार आमने-सामने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाल्यानंतर त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल. संघाच्या या भूमिकेवर लालकृष्ण अडवाणी मात्र प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आगामी काळात ते कठोर निर्णय जाहीर करू शकतात. दुसरीकडे राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्‍य असून त्‍यांच्‍या हाताखाली काम करण्‍यात अडचण नाही, असे वक्तव्‍य पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केले आहे. त्‍यामुळे आगामी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच राहण्‍याची शक्‍यता वाढली आहे.

आज दिल्‍लीत भाजप आणि संघाच्‍या समन्‍वय समितीची बैठक होणार आहे. त्‍यात संघाचे 25 आणि भाजप संसदीय मंडळाचे 11 नेते सहभागी होणार आहेत. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्‍या डावपेचांवर चर्चा होणार आहे. याच बैठकीत मोदींच्‍या नावावर अधिकृत निर्णय घेतला जाऊ शकतो.