आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी आळवला \'ठाकरी\' राग; गुजरातमधील गरीबी परप्रांतीयांमुळे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महाराष्ट्र दौ-यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे गुजरातच्या विकासाचे सर्व श्रेय तेथील मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना देतात. त्याचबरोबर, राज्यात विकासाची गंगा आणयची असेल तर, राज्यकर्त्यांनी मोदींकडून प्रशिक्षण घेण्याची गरजही आपल्या प्रत्येक भाषणात सध्या ते व्यक्त करत आहेत. तर, दुसरीकडे नरेंद्र मोदींनी 'ठाकरी' राग आळवायला सुरूवात केली आहे. गुजरातमधील गरिबीला परप्रांतीय जबाबदार असल्याचे आश्चर्यजनक वक्तव्य मोदींनी केले आहे.

मीडिया हाऊसमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात मोदी म्हणाले, गुजरातमध्ये गरीबी आयात होत आहे. अहमदाबाद आणि सुरत या शहरांमध्ये बाहेरच्या राज्यातून मोठ्या संख्येन रेल्वे येतात. या रेल्वेतून परप्रांतीय गुजरातमध्ये डेरे दाखल होत आहेत. जेव्हा जनगणना होते तेव्हा या लोकांचाही त्यात समावेश होतो, आणि राज्याच्या गरीबांची संख्या वाढते, असा खळबळजनक सिद्धांत मोदींनी मांडला आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना आणि मनसे हे दोन्ही प्रादेशिक पक्ष परप्रांतीयांमुळे राज्यात बकालपणा आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे आरोप करत आले आहेत. आता, शिवसेनेच्या सहकारी पक्षाचे मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मित्र नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत परप्रांतीयांवर हल्लाबोल केला आहे. मात्र, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही एका राज्याचे नाव घेतलेले नाही. परराज्यातून गरीबी आयात होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.