नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर असतील. बांगलादेशचया राजधानीमध्ये त्यांच्या भव्य स्वागताची तयारी करण्यात येत आहे. शहराच्या मुख्य चौकात त्यांच्या स्वागतासाठी मोठे-मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पण बांग्लादेश दौऱ्यापूर्वीच मोदींच्या दौऱ्याला विरोधही सुरू झाला आहे. लेबर पार्टी अँड डेमोक्रॅटिक स्टुडंट फ्रंटच्या कार्यक्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी ढाक्यात मोदींच्या विरोधात नारेबाजी केली.
मोदींच्या या दौऱ्यामुळे भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या बिघडणाऱ्या नात्यांमध्ये पुन्हा नवी ऊर्जा निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमध्ये सामाजिक संबंध आणखी मजबूत होण्याचीही शक्यता आहे. शनिवारी सकाळी ढाक्यात पोहोचल्यानंतर सर्वात आधी शहीद स्मारकाला भेट देण्याचा मोदींचा नियोजित दौरा आहे.
कोलकाता-ढाका बस सेवा सुरू होणार
भारतीय परराष्ट्र सचिवांनी शुक्रवारी सांगितले की, मोदींच्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शुक्रवारी रात्री बांगलादेशला पोहोचतील. त्या पंतप्रधान मोदींबरोबर कोलकाता-ढाका-अागरतळा दरम्यान बससेवेता शुभारंभ करतील. त्याचबरोबर त्या लँड बाँड्री करारावरही सह्या करतील. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय चर्चेत जमिनीबाबतचे करार होतील. तसेच भूमीची देवाण घेवाणही केली जाईल.