आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Chai Pe Charcha Campaign Latest News, Divya Marathi

चाय पर चर्चा: चहा विकून खूप शिकलो -नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची बुधवारी संध्याकाळी 'चाय पर चर्चा' सुरु झाली आहे. या दरम्यान त्यांनी लोकांना सांगितले, की चहा विकून मी खूप काही शिकलो. मोदी आपल्या या निवडणूक अभियानात २७ राज्यांमधील १ हजार चहा दुकानांच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. या दुकानांशी मोदी डीटीएच टेक्‍नॉलॉजी आणि एलसीडी स्क्रीनने जोडलेले आहेत. असे मानले जात आहे की, या चर्चेमध्ये २ कोटी लोक सहभागी आहेत. या चर्चेमध्ये मोदी जनेतेच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत.

मोदी म्हणाले की, भारतातील फुटपाथवरील 'टी स्‍टॉल' हे लोकसभेप्रमाणे आहेत, ज्याठिकाणी लोक विविध मुद्यांवर चर्चा करतात. त्यांनी 'चाय पर चर्चा' या अभियानाचा उद्देश एका चांगल्या, सक्षम सरकारसाठी लोकांचे विचार जाणून घेणे आहे, असे सांगितले.

चर्चेमध्ये काळ्या पैशाचा मुद्दा
लोकांशी चर्चा करताना मोदींनी काळ्या पैशाचा मुद्दा उपस्थित केला. मोदी म्हणाले, सध्या सर्वात मोठा चिंतेचा विषय विदेशात जमा असलेला काळा पैसा हा आहे. पुढे ते म्हणाले की, भाजपचे सरकार आल्यानंतर विदेशातील काळा पैसा परत भारतात आणला जाईल.

उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
लखनऊमधील एका व्यक्तीने उत्‍तर प्रदेशच्या सुरक्षा व्यवस्थेवर विचारलेल्या प्रश्नावर मोदींनी सांगितले की, एका चांगल्या शासनाचे पहिले काम कायदा-सुव्यवस्था कायम ठेवणे हे आहे. पुढे ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये पर्यटनाची चांगली शक्यता आहे. परंतु तेथील कायदा सुव्यवस्था ठीक नसल्यामुळे एखादा नवीन व्यक्ती येण्याचे धाडस करत नाही. मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये जर एखादा ब्लास्ट झाला तर, त्या समस्येतून मार्ग काढण्याऐवजी राज्यसरकार आणि केंद्रसरकारमध्ये भांडण सुरु होते.


पुढे वाचा : आणखी काय म्हणाले मोदी...