आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

100 दिवस : मोदी सरकारचे 24 निर्णय, वादग्रस्त, जलद आणि कौतुकास्पदही !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारने गेल्या 100 दिवसांमध्ये एकापाठोपाठ एक अनेक मोठे निप्णय घेतले आहेत. त्यापैकी काही निर्णय वादग्रस्त ठरले तर काही निर्णयांचे कौतुकही झाले. आतापर्यंत एकाही सरकारने घेतले नव्हते असे काही निर्णय मोदींच्या सरकारने प्रथमच घेतले. तर काही असेही निर्णय होते जे अत्यंत घाईत घेण्यात आले होते. असाच काही निर्णयांचा तज्ज्ञांच्या मदतीने आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या निर्णयांनी फायदा होईल, नुकसान होईल की काहीही फरक पडणार नाही, याचा अंदाज याद्वारे घेण्यात आला आहे.

नरम-गरम निर्णय
मोदींनी त्यांच्या निर्णयामध्ये ताळमेळ ठेवला आहे. शेजारी राष्ट्रांना मैत्रीचा हात दिला आणि त्याचवेळी त्यांच्या कारवायांना सडेतोड प्रत्युत्तरही दिले. मंत्री-अधिका-यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कामही केले.

नरम म्हणता येतील असे निर्णय

1. हिंदीच्या वापराचा निर्णय मागे
सरकारने सोशल मिडियावर हिंदीच्या जास्तीत जास्त वापरासंदर्भात सूचना काढली होती. पण विरोधानंतर हा आदेश मागे घेण्यात आला.

2. ग्रामीण भागात हाय-स्पीड इंटरनेट सेवेची घोषणा
मोदी सरकारने डिजीटल इंडिया कल्पनेअंतर्गत ग्रामीण स्तरावर वेगवान इंटरनेट ही पायाभूत गरज ठरवली. शिक्षण आणि टेलिमेडिसीनसाठी त्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

3. कधीही घ्या 12 गॅस सिलेंडर
मोदी सरकार सबसीडी कपात करणार असे वाटत होते. पण दर महिन्याला केवळ एकच अनुदानीत सिलेंडर मिळण्याऐवजी सरकारने केव्हाही 12 सिलेंडर घेण्यास मान्यता दिली.

4. प्रत्येक खासदाराने एक आदर्श गाव घडवावे
मोदींनी प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघात 2016 पर्यंत एक आदर्श गाव घडवण्याचे लक्ष्य दिले आहे.

5. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधीला आमंत्रित केले. परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा सुरू केली.

गरम...

6. पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या फुटीरतावाद्यांबरोबर भेटीनंतर सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली.

7. युपीएससीमधील हिंदीचा वाद
युपीएससीतील इंग्रजीचा पेपर रद्द न करण्यावर सरकार अडून राहिले. त्याचवेळी उमेदवारांना दिलासा देत केवळ त्याचे गुण समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला.

8. प्रादेशिक पक्षांना संदेश
शपथविधीला श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपाक्षे यांना आमंत्रण देऊन एनडीएच्या तमिळ सहकारी पक्षांची मनमानी चालणार नसल्याचा संदेश दिला.

9. माध्यमांत वक्तव्ये नको
नोकरशहांना फाइली आणि धोरण राबवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. तसेच माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देण्यास किंवा वक्तव्ये करण्यास बंदी लावली.

10. खर्चासाठी परवानगी लागेल
मंत्र्यांना एक लाखाहून अधिक खर्च करण्यासाठी पीएमओची परवानगी घ्यावी लागेल. अधिक खर्च न करण्याचे सल्ले देत मोदींनी कार खरेदी करू नये असेही सांगितले.

पुढे वाचा, असे निर्णय जे केवळ मोदींनी घेतले, पहिल्यांदाच...