आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली गाडी धडकवण्याचा दहशतवाद्यांचा कट !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांच्या जीविताला धोका आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय भारतात सक्रिय इंडियन मुजाहिदीन (आयएम) कडून मोदींवर आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत आहे. आयएसआय आत्मघाती हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिदीन यांचीही मदत घेण्याच्या तयारीत आहे. मात्र, भारतीय गुप्तचर संस्थेला आयएसआयची ही गंभीर कारवाई कुठपर्यंत पोहोचली याची माहितीच नाही. सुत्रांचे म्हणने आहे की, मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या एक वर्षापूर्वी गुप्तचर संस्थांना सुचना मिळाली होती की, लष्कर-ए-तोएबाचे एक पथक समुद्रमार्गे हल्ला करु शकते. एक वर्षानंतर हे पथक समुद्र मार्गे मुंबईत आले आणि त्यांनी तीन दिवस मुंबईसह देशाला वेठीला धरले होते.
गुप्तचर संस्थेच्या अधिका-यांनुसार यामुळेच प्रत्येक सुचनेला गंभीरतेने घेतले जात आहे. गुप्तचर संस्थेच्या सुत्रांचे म्हणने आहे की, इंडियन मुजाहिदीनचा मास्टर माइंड यासिन भटकळच्या चौकशीत याबद्दलची काही माहिती उघड झाली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी दुबई आणि सउदी अरब येथील दोन जणांच्या संभाषणामुळे संरक्षण यंत्रणा अधिक सजग झाल्या आहेत. या संभाषणाद्वारेच माहिती मिळाली आहे की, 2014 च्या निवडणूकी दरम्यान प्रचाराच्या रणधुमाळीचा फायदा घेत नरेंद्र मोदींसह अनेक मोठ्या नेत्यांच्या काफिल्यावर स्फोटकांनी भरलेली गाडी धडकवण्याची योजना आहे. या दहशतवादी हल्ला आत्मघाती असणार आहे. सुत्रांची माहिती आहे की, हे संभाषण संरक्षण यंत्रणांसाठी मोठे आव्हान घेऊन आले आहे. सुत्रांची मा्हिती आहे की, सर्व राज्यांना सुचना देण्यात आल्या आहेत की, नेत्यांच्या ताफ्यांवर कडक नजर ठेवली जावी आणि त्यांच्या संरक्षणात कोणतीही कमतरता राहू नये.