आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना योग, पंचकर्म सारख्या कोर्सचे वेगळे प्रमाणपत्र द्यावे - मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या आयुर्वेद दिनानिमित्त मंगळवारी दिल्लीत देशातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे (AIIA) उद्घाटन केले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) च्या धरतीवर राजधानीतील सरिता विहार येथे आयुर्वेद संस्थान उभारण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, बीएएमएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद, योग, पंचकर्मसह इतर कोर्सेसचे वेगवेगळे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. यामुळे ते त्यांची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरु करु शकतील. 

आणखी काय म्हणाले मोदी... 
- आयुर्वेद संस्थानच्या उद्घाटनानंतर मोदी म्हणाले, 'आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून प्रत्येक जिल्ह्यात एक आयुर्वेदिक हॉस्पिटल सुरु केले जाईल.'
- मोदींनी सर्वांना शुभेच्छा देत म्हटले की चांगल्या आरोग्याचे असे वातावरण निर्माण झाले पाहिजे की येथे येण्याची कोणाला गरज पडली नाही पाहिजे. या संस्थेमुळे आयुर्वेदाला नवी उर्जा मिळत आहे. ही संस्था संशोधन आणि आरोग्याचे केंद्र बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
 
बातम्या आणखी आहेत...